भारताचा पाकिस्तानाला इशारा

 भारत सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवादी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे. यामुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील होत आहे. जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

Updated: Aug 10, 2017, 09:08 AM IST
भारताचा पाकिस्तानाला इशारा title=

नवी दिल्ली :  भारत सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. दहशतवादी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहे. यामुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील होत आहे. जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रायलयाला सांगितलं आहे की, पाकिस्तानच्या जवानांकडून आधी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. त्यावर भारतीय लष्कराकडून प्रत्यूत्तर देण्यात आलं. पाकिस्तानकडून सीमाभागातून घुसखोरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून फायरिंग करुन भारतीय सैन्याचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे. एलओसीवर दहशवताद्यांच्या हालचाली वाढल्याचं देखील बोललं जातंय.