महिलांना अंतर्वस्त्रांच्या साईजनुसार हॉटेलच्या बिलात डिस्काऊंट; लोक भडकले

स्थानिक नागरकांनी या जाहिरातीबद्धल संताप व्यक्त केल्यानंतर हे पोस्टर रेस्टॉरंटने हटवले आहे

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 9, 2017, 04:21 PM IST
महिलांना अंतर्वस्त्रांच्या साईजनुसार हॉटेलच्या बिलात डिस्काऊंट; लोक भडकले title=

बिजिंग : ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक हटके ट्रिक्स वापरलेल्या आपण पाहिल्या असतील. मात्र, चीनमधील एका रेस्टॉरंटने सर्व सीमा पार करत भलतीच ट्रिक वापरत डिस्काऊंट ऑफर सुरू केली आहे. ज्यामुळे लोक तर नाराज आहेतच पण, विशेषता महिला प्रचंड चिडल्या आहेत. या रेस्टॉरंटने महिलांना अंतर्वस्त्रांच्या साईजनुसार डिस्काऊंट ऑफर दिली आहे.

या ऑफरमुळे एकच खळबळ उडाली असून, अनेकांनी या ऑफरमुळे रेस्टॉरंटवर प्रचंड टीका केली आहे. तर काहींनी ही कल्पना फारच मजेशीर असल्याचे सांगत त्याला पाठींबाही दिला आहे. या रेस्टॉरंटमध्ये जेवन करणाऱ्या महिलांना किती डिस्काऊंट मिळणार हे त्यांच्या 'ब्रेस्ट'च्या साईजवर अवलंबून असणार आहे.

ही ऑफर झेजियांग या प्रमुख शरहाच्या एका बाजूला असलेल्या हांग्जो प्रांतातील रेस्टॉरंटने दिली आहे. आपली ऑफर सर्वदूर पोहोचावी यासाठी या रेस्टॉरंटने विशेष काळजी घेतली असून, त्यासाठी एक जाहिरातही दिली आहे. जाहिरातीच्या पोस्टरमध्ये 'ब्रा' घातलेल्या महिलांची कार्टून (व्यंगचित्रे) दाखवली आहेत. या व्यंगचित्रांच्या खाली लिहिलेल्या कॅप्शनमध्ये “The whole city is looking for BREASTS”,(संपूर्ण शहराला ब्रेस्टमध्ये रूची आहे. ) असे म्हटले आहे. दरम्यान, रेस्टॉरंटच्या या विक्षिप्त जाहिरातीबद्धल लोक फारच चिडले असून, त्यांनी आपला रागही व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

या विक्षिप्त ऑफरला रेस्टॉरंटने The Trendy Shrimp असे नाव दिले आहे. या ऑफरनुसार महिलांना त्यांच्या ब्रेस्टप्रमाणे डिस्काऊंट मिळेल. ज्या महिलेच्या ब्रेस्टचा आकार अधिक असेल तीला जास्त डिस्काऊंट तर, एखाद्या महिलेच्या ब्रेस्टचा आकार छोटा असेल तर तिला त्याप्रमाणे डिस्काऊंट मिळेल.

दरम्यान, Qianjiang Evening पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक नागरकांनी या जाहिरातीबद्धल संताप व्यक्त केल्यानंतर हे पोस्टर रेस्टॉरंटने हटवले आहे. स्थानिक नागरिकांनी या ही जाहिरात अत्यंत अश्लिल आणि महिलांबाबत भेदभाव करणारी असल्याची प्रतिक्रीयाही व्यक्त केली आहे.