मोबाईलचा डेटा वापरात भारत जगात नंबर वन !

भारतात वापरला जातोय तब्बल 150 कोटी गीगाबाईट्स डेटा

Updated: Dec 26, 2017, 03:28 PM IST
मोबाईलचा डेटा वापरात भारत जगात नंबर वन ! title=

नवी दिल्ली : भारतात वापरला जातोय तब्बल 150 कोटी गीगाबाईट्स डेटा

150 कोटी गीगाबाईट्स डेटा

दरमहिन्याला 150 कोटी गीगाबाईट्स मोबाईल डेटा वापरून, भारत सर्वाधिक डेटा वापरणारा देश ठरलाय. निती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी यासंदर्भातली माहिती दिलीय.

जगात नंबर वन

आश्चर्यकारकरित्या 150 कोटी गीगाबाईट्स मोबाईल डेटा वापरात आपण जगात नंबर वन ठरलो आहोत. मोबाईल डेटा वापराच्या बाबतीत आपण अमेरिका आणि चीनलासुद्धा मागे सोडलं आहे, असं अमिताभ कांत म्हणाले.

अमेरिका आणि चीनच्या पुढे

अमेरिका आणि चीनच्या दरमहिन्याच्या डेटाला एकत्रित केल्यानंतरसुद्धा भारताचा मोबाईलचा डेटा वापर जास्त आहे. ही माहिती जाहीर करताना अमिताभ कांत यांनी या माहितीचा स्त्रोत मात्र सांगितलेला नाही. 

डेटा देण्याची स्पर्धा

गेल्या काही दिवसांत टेलिकॉम कंपन्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या योजना देत आकर्षित केलं जातय. ग्राहकांना कमी दरात जास्तीत जास्त डेटा देण्याची स्पर्धा सुरू आहे.