Interesting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत

Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. 

Updated: Nov 28, 2022, 02:13 PM IST
Interesting Fact : पाण्याला कुठून मिळतो हा ओलावा? 99% लोक याचं उत्तर देऊच शकले नाहीत  title=
Importance and significance Of Water and logic behind its wet characteristic

Water Facts: पाणी. जल हेच जीवन (Water is Life), पाण्यावाचून या जगात आणखी महत्त्वाचं काहीच नाही वगैरे वगैरे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पाणी, त्याचे गुणधर्म आणि त्याचे उपयोग आपण शालेय जीवनातच शिकतो. पण, अशीही काही माहिती आहे ज्याबाबत सहसा चर्चा होत नाही. कारण, याविषयी फार कमीजणांना अधिकृत संदर्भ ठाऊक आहेत. पाण्यासंबंधीचा असाच एक प्रश्न सरकारी नोकऱ्यांमध्ये मुलाखतींदरम्यान विचारला जातो. अनेकांना त्याचं उत्तर आजही जमलेलं नाही. बरं, जर कुणाला या प्रश्नाचं उत्तर जमलं तर तो खरा हुशार म्हणावा. 

पाण्याला कुठून येतो ओलसरपणा? 

पाण्याची रासायनिक व्याख्या आहे, H₂O. पाण्यामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनमध्ये मुळातच आर्द्रता असते. ज्यामुळं त्याचा ओलसरपणा आपल्याला जाणवतो. ओंजळीत पाणी ठेवलं असता किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला पाण्याचा स्पर्श झाला असता ते ओलं लागण्यामागेही विज्ञान (Science) आहे हे विसरुन चालणार नाही. 

जगभरात पाण्याचा एकूण किती साठा? 

जाणून थक्क व्हाल, पण हे खरंय. (Water on earth) पृथ्वीवर पाण्याचा 326 मिलियन ट्रिलियन गॅलन इतका साठा आहे. यामध्ये 97 टक्के पाणी हे समुद्राचं आहे. परिणामी ते पिण्यायोग्य नाही. याशिवाय पृथ्वीवर 2 टक्के पाणी ग्लेशियर्सच्या रुपात असल्याचं सांगण्यात येतं. यातही 2 टक्के जलसाठा हा ग्लेशियर्सच्या आईस कॅप्सच्या रुपात असल्यामुळं ते पाणीही सर्वसामान्य नागरिकांना वापरता येत नाही. 

हेसुद्धा वाचा : मानवाला राहण्यासाठी पृथ्वीपेक्षा एकदम मस्त जागा; शास्त्रज्ञांना सापडले जीवसृष्टी असलेले 24 ग्रह

पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचे साठे अवघ्या 1 टक्क्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणूनच पाणी वाचवा असं वारंवार सांगितलं जातं. कारण, पृथ्वीवर पाण्याचा साठा मर्यादित प्रमाणातच असल्यामुळं भविष्यात पाण्याचा गैरवापर न थांबल्याच त्याची मोठ्या प्रमाणात टंचाईसुद्धा भासू शकते. 

पाण्याबाबत आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, शरीरात जेव्हा 1 टक्के पाण्याची कमतरता जाणवते तेव्हा आपल्याला तहान लागते. विकसनशील देशांमध्ये दोन तृतीयांश किंबहुना त्याहूनही जास्त आजार पाण्यापासून उदभवत असल्याचं सांगण्यात येतं.