पाकिस्तान, नेपाळमध्येही साजरी होतेय होळी

भारताबरोबरच आपल्या शेजारची राष्ट्र देखील होळीच्या रंगात न्हाऊन निघली आहेत.

Updated: Mar 2, 2018, 09:41 AM IST
पाकिस्तान, नेपाळमध्येही साजरी होतेय होळी title=

नवी दिल्ली : भारताबरोबरच आपल्या शेजारची राष्ट्र देखील होळीच्या रंगात न्हाऊन निघली आहेत.

नेपाळमध्ये होळीनिमित्तानं होलिकादहन आणि रंगांचा सोहळा साजरा करण्यात आला. 'बुरा ना मानो होली है...' म्हणत पाकिस्तानातल्या कराची शहरातही मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आला. 

कराचीमधील स्वामीनारायण मंदिरात रंगोत्सव पार पडला.