पुलावरुन कोसळली हायस्पीड ट्रेन, अनेक गाड्या दाबल्या गेल्या

वेगवान ट्रेनच्या एका अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 19, 2017, 10:53 AM IST
पुलावरुन कोसळली हायस्पीड ट्रेन, अनेक गाड्या दाबल्या गेल्या title=

वॉशिंग्टन : वेगवान ट्रेनच्या एका अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात सोमवारी सकाळी टकोमा शहराजवळ एक वेगवान एमट्रॅक ट्रेनला अपघात झाला. गाडीचे डबे रुळावरुन घसरल्याने ते पुलाखालील एका हायवेवर पडले. या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहेय. 

ही घटना वॉशिंग्टनच्या सीएटलपासून सुमारे 64 किलोमीटर दूर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी वाहतूक सुरु होती. या घटनेची छायाचित्रे पाहून तुम्हाला घटनेचा अंदाज येऊ शकतो. पुलवरून ट्रेनचे डबे घसरल्याने 13 कार यामध्ये दाबल्या गेल्या.

या ट्रेनमध्ये चालकासह 78 प्रवासी आणि पाच कर्मचारी प्रवास करत होते. अपघाताचे कारण अजून समजलेलं नाही. या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.