तुम्ही कधी पाहिला का नवरीचा बाजार? पालक मुलींना विकतात, अन् पुरुष करतात बायकोची खरेदी

Bride Market : तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या जगातील एका देशात नवरीचा बाजार भरतो. इथे पालकच मुलींना विकतात आणि पुरुष बायको विकत घेतात.   

Updated: Dec 4, 2023, 03:16 PM IST
तुम्ही कधी पाहिला का नवरीचा बाजार? पालक मुलींना विकतात, अन् पुरुष करतात बायकोची खरेदी  title=
Have you ever seen a bride market Parents sell girls, and men buy wives Weird Tradition

Bride Market : ऐकावं ते नवलं...जगाच्या पाठीवर कुठे काय घडेल याचा काही नेम नाही. आपण अनेक बाजारपेठ्यांचा उल्लेख ऐकला आहे. भाजीपाला, फळ मार्केट अगदी भांडे, मटन मार्केट असे अनेक...पण तुम्ही कधी नववधूचं मार्केट पाहिलं आहे का? आश्चर्य वाटलं ना...पण या बाजारात पालक मुलीची विक्री करता आणि पुरुष बायकोची खरेदी करतात. आपल्या देशात मुलीला लक्ष्मीचं स्थान देण्यात आलं आहे आणि इथे या देशात मात्र मुलीची लग्नासाठी विक्री केली जाते. ही कुठली परंपरा किंवा कुठली प्रथा...हा धक्कादायक प्रकार बुल्गेरियामध्ये होतो. इथे वधू विकण्यासाठी खास बाजारपेठ भरते. (Have you ever seen a bride market Parents sell girls and men buy wives Weird Tradition)

मुलगी म्हणजे वस्तू नाही! 

असा प्रकारचा बाजार भरणे हे कितपत योग्य आहे. खरं सर्वसाधारणपणे खरेदी विक्रीवर बंदी आहे, पण बल्गेरियात खुलेआम बाजारपेठ भरुन मुलींची विक्री केली जाते. धक्कादायक म्हणजे या देशात वधू बाजारातून अशा खरेदीला कायदेशीर मान्यता आहे. इथे पुरुष बाजारात फिरतात आणि आपल्या आवडीची मुलगी शोधतात. मग त्यानंतर त्या मुलीच्या पालकांशी सौदेबाजी करुन तिला विकत घेतात आणि घरी घेऊन जातात. पण या बाजारातून खरेदी केलेली तरुणीला त्या व्यक्तीला पत्नीचा दर्जा देणे बंधनकारक असतं. 

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बल्गेरियन सरकारनेही हा बाजार उभारण्याची परवानगी दिली आहे. या बाजारात मोठ्या प्रमाणात मुलींची विक्री होते. या मुलींच्या किंमतीही वेगवेगळ्या असतात. विशेष म्हणजे इथे अविवाहित तरुणींसोबत विधवा आणि घटस्फोटित मुलींची विक्री केली जाते. ज्या मुली अविवाहित आहेत त्यांची किंमत अधिक असते. त्यानंतर विधवा आणि घटस्फोटितांना या बाजारात कमी मोल मिळतो.  यासोबतच बाजाराबाबत विशेष नियम सांगण्यात आले आहेत. या वधू बाजारपेठेत केवळ कलैदझी समाजातील लोकच आपल्या मुलींची विक्री करू शकतात. त्याशिवाय या समाजातील फक्त गरीब कुटुंब मुलींची वधू बाजारपेठेत विक्री करु शकतात. श्रीमंत कुटुंबियांना आपली मुलगी विकण्यास मान्यता नाही. या बाजारपेठातून विकत घेतलेल्या तरुणीशी लग्न करणं बंधनकारक आहे. 

अशा प्रकारे बाजारपेठ भरवण्यामागे कलैदझी समाजातील गरीब पालक मुलींचं लग्न करु शकत नाही. त्यामुळे वधू बाजारातून ते आपल्या मुलीला विकून पैसे मिळवतात आणि तिचं लग्न करुन देतात.