धावत्या बाईकवर तरुणीचा खतरनाक स्टंट, रील बनवताना हवेत उडाली अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Women Stunt Video Viral: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. असाच एक अंगावर काटा आणणार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 14, 2023, 07:05 PM IST
धावत्या बाईकवर तरुणीचा खतरनाक स्टंट, रील बनवताना हवेत उडाली अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO title=
girl doing dangerous stunt on bike accident watch what happen next

Women Stunt Video Viral: सोशल मीडियाच्या (Social Media) या अभासी जगात आजकाल रील्स आणि लाइव्ह व्हिडिओचे प्रमाण वाढत आहेत. रील्स (Reels) करण्यासाठी आणि त्याचे लाइक्स वाढवण्यासाठी धोकादायक स्टंटही (Stunt Video) केले जातात. लाइक, शेअरच्या वेडापायी अनेक तरुण-तरुणी जीव धोक्यात घालतात. कित्येक जणांना तर आपले प्राणही गमवावे लागले आहेत. सोशल मीडियावर तुम्ही असेन व्हिडिओ पाहिले असतील. अलीकडेच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाचाही संताप अनावर होईल. (Social Media Stunt Video Viral)

तरुणीचा व्हिडिओ व्हायरल 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुणी बाईकवर स्टंट करताना दिसून येत आहे. याआधीही तुम्ही बाइकवर स्टंट करतानाचे व्हिडिओ पाहिले असतील मात्र तो आत्ताचा व्हिडिओ पाहून तुम्हीही कपाळावर हात मारुन घ्याल. एक तरुण बाइक चालवत होता तर त्याच्या पुढच्या सीटवर एक तरुणी बसली आहे. ही तरुणी आरामात त्याच्या पुढ्यात बसून फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवत होती. इतकंच नव्हे तर काहीच वेळात मुलगा बाईकची पुढचं चाक हवेत उडवतो. त्यानंतर असं काही घडतं की तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. 

दोन दुचाकींचा अपघात 

खतरनाक स्टंट करत असताना दोघांच्याही चेहऱ्यावर भीतीचा लवलेशदेखील नव्हता. बाईकवर बसलेली ही तरुणी बिनधास्त व्हिडिओ बनवत होती. दोघंही एका रहदारीच्या रस्त्यावर बाइकने प्रवास करत होते. त्याचवेळी त्यांच्यासमोरुन दोन बाइक आल्या त्यातील एका बाईकची तरुणाच्या बाईकला धडक बसली. या अपघातानंतर पुढे बसलेली तरुणी खाली पडली. मागच्या मागेच खाली पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 

खतरनाक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल

तरुणी बाईकवरुन खाली पडल्यानंतर तिचा मित्रही खाली कोसळला. या घटनेनंतर त्यांची मदत करण्यासाठी लोकांची गर्दी झाली. व्हिडिओत दिसत आहे की, तरुणी खाली पडल्यानंतर ती थरथरत आहे. तसंच ती बेशुद्धदेखील झाली आहे. ही घटना नेमकी कुठली आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. हा खतरनाक स्टंट पाहिल्यानंतर युजर्सही हैराण झाले आहेत. मात्र, ही काही पहिलीच घटना नाहीये. याआधीही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. 

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे व या तरुणीचे काय झालं हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. काही युजर्सच्या मते, हा व्हिडिओ विदेशातील आहे. या अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहे. तर, काहींनी ही तरुणी लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थनाही केल्या आहेत.