Funny Reaction of kids: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने पाहणाऱ्यांचं मन जिंकलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या लहान मुलांची निरागसता पाहायला मिळतेय.
लहान मुलांचं मन निर्मळ असतं. लहान मुलं अनेकदा असं काहीतरी करतात, ज्यामुळे त्यांची निरागसता स्पष्ट अधोरेखित होते. असाच एक लहान मुलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलं त्यांचे आई आणि बाबा घराबाहेर गेल्यावर कसं रिऍक्ट करतात हे पाहायला मिळतंय.
या व्हिडिओत या लहान मुलांची आई घराबाहेर पडताना पाहायला मिळते. जेंव्हा आई घराबाहेर पडते तेंव्हा ही लहान मुलं तात्काळ जागेवरून उठतात, आपल्या आईला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तिला मिठी मारतात. मात्र, त्यांचे बाबा घराबाहेर पडतात तेंव्हा हिचं मुलं काय रिऍक्शन देतात? पाहा व्हिडीओ
या व्हिडिओमध्ये मुलांचे बाबाही घराबाहेर जाताना पाहायला मिळतायत. लहान मुलांना बाबा बाय करून घराबाहेर पडतात. मात्र, बाबा घराबाहेर जाताना मुलं कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. बाबा घराबाहेर गेल्याचं समजताच मुलं पुन्हा खेळायला लागतात. यावर व्हिडीओ पाहणारे दर्शक म्हणतात की मुलं कायम आईच्या जास्त जवळ असतात.
हा व्हिडीओ केवळ 37 सेकंदांचा आहे. मात्र या व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील दर्शकांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या व्हिडिओवर तब्बल 1.4 मिलियन व्ह्यू आले आहेत. नागरिकांनी या ट्रेंडिंग व्हिडिओवर अनेक कमेंट्सही केल्या आहेत.
funny video of reaction of kids when their mom and dads goes out of home video viral on internet