Weird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम

Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात.  कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

Updated: Nov 26, 2023, 03:59 PM IST
Weird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम title=
Fathers do strange things so that the girl can have physical relations with many boys love huts Weird Tradition in cambodia

Weird Tradition : आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहता. आजही काही जमाती अशा आहे ज्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. एवढंच नाही तर या जमाती आपल्या वर्षांनुवर्ष सुरु असलेल्या जुन्या, विचित्र (unique rituals) आणि धक्कादायक प्रथा पाळताना दिसतात. एक अशाच जमातीबद्दल आम्ही सांगणार आहोत. जिथे वडील आपल्याच लेकीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून खास प्रेमाची झोपडी बांधतात. ऐकून आश्चर्यचकित झालात ना जगाच्या पाठीवर एका जमातीत ही प्रथा पाळली जाते. (Fathers do strange things so that the girl can have physical relations with many boys love huts Weird Tradition in cambodia)

लग्नापूर्वी आपल्या देशात सेक्स करणं अत्यंत चुकीचं मानलं जातं. लिव्ह इन रिलेशनशिपबाबतही आपल्या देशात त्या प्रमाणात मान्यता नाही. या जमातीत वडीलच लग्नापूर्वी मुलीला सेक्स (intimate relation before marriage) करण्यासाठी झोपडी बांधून देतात ही विचित्र गोष्ट वाटते.

या जमातीत अनेक प्रथा आहेत, ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. ही प्रथा कंबोडिया देशातील कुन गावात आजही पाळली जाते. या गावातील करुंग (cambodia kreung tribe) समुदायात ही विचित्र प्रथा आहे. या प्रथेनुसार किशोरवयीन मुलींना त्यांचा आवडता जोडीदार निवडण्यासाठी तब्बल 10 मुलांशी संबंध ठेवण्याची परवानगी दिली जाते. 

मुलीला इतर मुलांशी संबंध ठेवता यावं म्हणून खुद्द वडील झोपडी बांधतात. त्या झोपडीला लव्ह हट म्हणून ओखळलं जातं. या प्रेमाच्या झोपड्यांमध्ये मुली आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहता, वेळ घालवतात आणि शारीरिक संबंध ठेवतात. या गावातील लोकांचं म्हणं आहे की, समाजातील आणि कुटुंबातील महिलांना ते सक्षम बनवतात. त्यासोबत अशा प्रकारे लव्ह हटमध्ये मुलींना त्यांच्या आयुष्याचा योग्य जोडीदार मिळवण्यास मदत होते. पण दुसरी बाजू बघितली तर या गावातील अनेक लोकांचं म्हणं आहे की,  या प्रथेमुळेच इथे घटस्फोट आणि शारीरिक छळाचे प्रमाण खूपच कमी आहे. 

आज जिथे आपण अजूनही लव्ह मॅरेजला विरोध करताना दिसतो. पालक मुलांसाठी जोडीदार निवडतात अशामध्ये या जमातीत मुलींना योग्य जोडीदार मिळावा यासाठीची ही अनोखी परंपरा पाळताना दिसत आहे. विशेष म्हणजे यासाठी वडील पुढाकार घेतात. वडील आणि लेकीचं नातं खूप खास असतं. आपली लेक इतर मुलांशी बोलली तरी आपल्याला राग येतो. अशावेळी वडीलच मुलीला एकापेक्षा अनेक तरुणांसोबत संबंध ठेवण्यासाठी सोय करतात हे विचित्र वाटणार आहे.