तब्बल 10000 महिलांबरोबर Sex, 'या' दिग्गज खेळाडूंच्या दाव्याने क्रीडा जगतात खळबळ

Sports News: एका दिग्गज खेळाडूच्या दाव्याने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. या खेळाडूने केलेल्या दाव्यानुसार त्याने तब्बल दहा हजार महिलांबरोबर सेक्स केला आहे. या खेळाडूवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. 

Updated: Jul 1, 2023, 10:15 PM IST
तब्बल 10000 महिलांबरोबर Sex, 'या' दिग्गज खेळाडूंच्या दाव्याने क्रीडा जगतात खळबळ title=

Sports News: क्रीडा क्षेत्रातील खेळाड युवा वर्गाचे आयडॉल (Idol) असतात. मग ते कोणत्याही क्रीडा क्षेत्रातले खेळाडू असू देत. या खेळाडूंचा फॉलोअर्सही (Followers) मोठ्या प्रमाणावर असतो. आपले आपले आवडते खेळाड कसे खेळतात, कसे राहातात, त्यांची हेअरस्टाईल याचं अनुकरण फॉलोअर्स करत असतात. पण आपल्या आवडत्या खेळाडूचा एखादं वाईट प्रकरण समोर येतं, तेव्हा त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसतो. असाच एक प्रकार क्रीडा जगतात उघडकीस आला असून यावेळे मोठी खळबळ उडाली आहे. एका दिग्गज खेळाडूने केलेल्या दाव्याने चर्चांना उधाण आलं आहे. या खेळाडूवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला आहे. 

दिग्गज खेळाडूचा दावा
या खेळाडूचं नाव आहे बेंजामिन मेंडी (Benjamin Mendy), बेंजामिन मेंडी हा प्रसिद्ध फुटबॉलपटू (Footballer) असून तो मॅनटेस्टर सिटीकडून (Manchester City) खेळतो. बेंजामिन मेंडीवर बलात्कार आणि बलात्काराचा प्रयत्न असा दुहेरी खटला सुरु आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार तब्बल 10 हजार महिलांबरोबर सेक्स केल्याचा दावा बेंजामिन मेंडीने केला आहे. बेंजामिन मेंडवर 2020 मध्ये  मोट्रम सेंट एंड्रयू, चेशायरमध्ये एका 24 वर्षीय तरुणीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर एका तरुणीवर बलात्कार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. 

2018 मध्ये विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा तो खेळाडू आहे. बेंजामिन मॅचेंस्टर सिटीसाठी तब्बल 75 सामने खेळला आहे. त्याआधी मेंडी अंडर-16, अंडर-17 संघाकडून खेळला आहे. अंडर-17 संघातून खेळताना फ्रान्सने विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारली होती. 

वादग्रस्त कारकिर्द
26 ऑगस्ट 2021 मध्ये मेंडीवर बलात्काराचे चार आणि लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आला. 2020 ते 2021  या काळात 16 वर्षाखालील तीन अल्पवयीन मुलींनी त्याच्याविरोधात अत्याचाराची तक्रार केली. या आरोपांचा इन्कार करत त्याने जामीनासाठी अर्ज केला, पण तो फेटाळण्यात आला. यानंतर मॅंचेस्टर सिटीने क्लबने त्याचं निलंबन केलं. 2022 मध्ये त्याला काही अटीशर्तींवर जामीन देण्यात आला. त्याला देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली. इतकंच नाही तर त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला. 

मेंडीवर एकूण आठ बलात्काराचे आरोप करण्यात आले. याशिवाय बलात्काराच्या प्रयत्नाचं एक प्रयत्न आणि लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. याप्रकरणाची गंभीरता  लक्षात घेता 14 ज्यरी सदस्यांची स्थापना  करण्यात आली. यात आठ पुरुष आणि सहा महिला सदस्यांचा समावेश होता.