Fact Check : पाण्यावर चालण्याचा चमत्कार की हातचलाखी?

एक व्यक्ती चक्क पाण्यावरून चालत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झालाय. पाण्यावरून ही व्यक्ती कशी काय चालतेय? याची आम्ही पोलखोल केली. 

Updated: Jun 11, 2022, 10:52 PM IST
Fact Check : पाण्यावर चालण्याचा चमत्कार की हातचलाखी? title=

मुंबई : एक व्यक्ती चक्क पाण्यावरून चालत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झालाय. पाण्यावरून ही व्यक्ती कशी काय चालतेय? याची आम्ही पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol magecian walk on water)
 
दावा आहे की ही व्यक्ती पाण्यावर चालतेय. हा व्हिडिओ व्हायरल करून तसा दावा करण्यात आलाय...आता या व्हिडिओत पाहा. ही व्यक्ती सहज स्वीमिंग पूलमधील पाण्यावर चालतेय. पाण्यात लोक पोहतायत. त्यामुळे पाण्यात काही ठेवलं असावं अशी शंकाही आली. पण, पाण्यात त्यानं कुठलाही आधार घेतलेला दिसत नाही. 

त्यामुळे आम्ही ही व्यक्ती कसं काय पाण्यावरून चालतेय याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आता हा व्हिडिओ पाहा. पाण्यावरून चालण्याआधी या व्यक्तीनं पाण्यातून बांधलेली दोरी कापून टाकली. या व्यक्तीला पाण्यावरून चालत गेल्यानंतर झाडाला लावलेलं नोटांचं बंडल मिळणार होतं. त्यामुळे बघा, ही व्यक्ती कशी पाण्यावरून चालतेय. 

पाण्यात कोणताही आधार नाही. पण, ही व्यक्ती कशी काय पाण्यावरून चालते याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी या व्हिडिओतील व्यक्तीबद्दल माहिती मिळाली. मग काय पोलखोल झाली पाहुयात.

व्हायरल पोलखोल

पाण्यावर चालणाऱ्या व्यक्तीचं नाव मॅक किंग आहे. मॅक किंग प्रसिद्ध जादूगार आहेत. पाण्यावर कसे चालले याचं उत्तर अजून कुणालाच कळलं नाही. जादूगार असल्याने त्यांनी पाण्यावरून चालताना हातचलाखी केली.  

हा व्हिडिओ 2021 सालातील असून, अमेरिकेत हा जादूचा प्रयोग केला होता. पाण्यावर चालण्यामागचं गूढ अजूनही उकललं नाहीये. आम्हीही काही जादूगारांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनाही यामागचं सत्य कळू शकलं नाही.