अंघोळ न करता बेडवर जाणं म्हणजे इथे तर कायद्याने गुन्हाच, पाहा अजब नियम

अंघोळ न करता बेडवर जाणं कायद्याने गुन्हा, जगातले अजब कायदे, जे ऐकून तुम्ही म्हणाल काहीही! 

Updated: Jun 11, 2022, 04:30 PM IST
अंघोळ न करता बेडवर जाणं म्हणजे इथे तर कायद्याने गुन्हाच, पाहा अजब नियम title=

Trending News: आपल्याकडे जरा कायदा बदलला की वाटतं किती अजब आहे हे! पण जगात असे काही देश आहेत तिथे अजब नियम आहेत. जे वाचूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्याला आपल्या हिशोबाने काम करण्याची सवय असते. मात्र प्रत्येक काम नीट आणि सुरळीत व्हावं यासाठी काही नियम आणि कायदे प्रत्येक देशात तयार केले जातात. 

काही देश असे आहेत ज्यांनी अजब नियम किंवा कायदे केले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. हे नियम वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

हा विषय चर्चेत आला तो म्हणजे क्षमा बिंदूच्या लग्नामुळे. भारतात अशा प्रकारचं लग्न हे वैध धरलं जात नाही अशी चर्चा रंगली. स्वत:ने स्वत:शी केलेल्या या अजब लग्नानंतर याची चर्चा जास्त रंगली. आज आम्ही तुम्हाला जगातील काही देशांमध्ये पाळल्या जाणार्‍या अशा नियमाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

इंग्लंडमध्ये असा एक प्रदेश आहे जिथे अंघोळ न करता बेडवर जाणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी मोठी शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे अशी चूक करणं महागात पडू शकतं. 

अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसकोमध्ये फक्त अंतरवस्त्र घालून गाडी धुवत असाल तर हा गुन्हा मानला जातो. अशा लोकांना दंड ठोठावला जातो आणि वॉर्निंगही दिली जाते. 

स्वित्झरलँडमध्ये रात्री 10 नंतर बाथरुमचा प्लश सुरू ठेवणं गुन्हा मानला जातो. ज्या घरातून प्लशचा आवाज येईल त्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. 

इटलीमध्ये मिलान शहरात हसण्यावर बंदी आहे. या शहरात जर तुम्हाला हसताना पकडलं गेलं तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. 

ब्रुनेईमध्ये समलिंगी संबंध बेकायदेशीर मानले जातात. दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. 

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )