नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या काळात फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केला होता. फेसबुकच्या यूझर्सनी शेअर केलेली माहिती जपण्याची जबाबदारी कंपनीची आहे. जर, अशी माहिती लीक झाली असेल, तर ती कंपनीची चूक आहे. असं झुकरबर्गनं त्याच्या फेसबुक पेजवर म्हटल होतं. माहीती लीक झाल्याच्या प्रकरणानंतर आता फेसबुककडून डेटा चोरी होण्याचा प्रकार समोर आलायं.
साधारण 5 कोटी यूजर्सची माहिती चोरीला गेल्याचं सोशल नेटवर्कींग साईट्सचं म्हणणं आहे. यावेळेस हा डेटा कोणाला विकला गेला नाही तर हॅकरने चोरल्याचे सांगण्यात येतयं. फेसबुक याप्रकरणाची चौकशी करत आहे. प्राथमिक धोका टाळण्यासाठी सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. लीगल डिपार्टमेंटलाही यावर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
'व्यू ऐज' या फिचरवर हॅकरने हल्ला केलायं. हे फिचर फेसबुकवरील लोकप्रिय फिचर आहे. याद्वारे कोणताही यूजर कोणत्याही दुसऱ्या युजर्सची प्रोफाइल बघू शकतो. या माध्यमातून हॅकर यूजरच्या अकाऊंटमध्ये शिरला आणि डेटा हॅक केला. फेसबुकने सध्या हे फिचर डिसॅबल केलंय. 25 सप्टेंबरच्या दुपारी आम्हाला या हॅकिंगबद्दल समजले पण तोपर्यंत 5 कोटी युजर्सचा डेटा हॅक झाल्याचे फेसबूक प्रोडक्ट मॅनेजमेंटचे वाइस प्रेसिडेंट गाई रोजन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून आम्ही याचा मागोवा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
फेसबुकच्या म्हणण्यानुसार 'व्यू एज' फिचरमधून हॅकर साइटमध्ये घुसले. त्यांनी फेसबुकचे एक्सेस टोकन चोरले आणि यूजर्सच्या अकाऊंटवर कंट्रोल केला. एक्सेस टोकन हा 'डिजिटल की'प्रमाणे असतो. यामुळे युजर्सना सारखसारख लॉग इन करायची गरज लागत नाही. फोनवर एकदा फेसबुक डाऊनलोड केलं की युजर्स साऱख साऱख लॉग इन न करता वापर करतात. आपले खाजगी कॉम्प्यूटरही लोक लॉगआऊट करत नाही. याचाच फायदा हॅकर्सनी उठवला.