जकार्ता: इंडोनेशियाला शुक्रवारी ताकदवान भूकंपामुळे आलेल्या भीषण त्सुनामीचा तडाखा बसला. इंडोनेशियाच्या सुलावेसी द्वीपमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे पालू आणि डोंगाला या शहरांतील अनेक घरे व इमारती उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळत आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जिओफिजिक्सच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताकदवान भूकंपामुळे समुद्रात ही त्सुनामी निर्माण झाली. याचा सुलावेसी प्रांताची राजधानी असलेल्या पालू आणि डोंगाला शहराला मोठा तडाखा बसला.
याशिवाय, त्सुनामीमुळे संदेशवहन व दळणवळणाच्या सर्व साधनांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे याठिकाणची माहिती मिळवण्यात अडथळे येत आहेत. मात्र, येथील मदतकार्यासाठी सर्व राष्ट्रीय यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. शनिवारी सकाळपर्यंत या दोन्ही शहरांमध्ये हेलिकॉप्टर्स पोहोचतील, असे आपत्ती विभागाचे प्रवक्ते सुटोपो पुरवो नुगरोहो यांनी सांगितले.
Breaking: Tsunami hits Palu, Indonesia after massive 7.7 earthquake. Major damage is being reported. pic.twitter.com/nRvge2mKy2
— PM Breaking News (@PMBreakingNews) September 28, 2018