मुंबई : कॅनडाच्या कॅलगरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नोकराने स्वत:ला जेसीबीने नेऊन मालकाचा बंगला तोडला. मालकाचा दोष होता की, त्याने चोरीचा आरोप असलेल्या नोकराला नोकरीवरून काढून टाकले होतं. अखेर या नोकराने संतापून तलावाच्या काठावरील मालकाचा बंगला तोडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
कॅनडातील या घटनेचा व्हिडीओ डॉन टॅपस्कॉट नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, संतप्त कर्मचाऱ्याने तलावाजवळील मालकाचे घर फोडले आहे. काय झाले याबद्दल कोणाकडे काही माहिती आहे का?
कॅनडामध्ये नोकराकडून मालकाचे घर पाडल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हायरल व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 5 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय 500 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.
You can’t make this up. A disgruntled, fired employee from a marina near our lake house snapped and destroyed the entire marina with an excavator. Does anyone have more information on what happened? #Muskoka pic.twitter.com/XcCLAVBFMy
— Don Tapscott (@dtapscott) July 27, 2022
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली. या कर्मचाऱ्याचे वय ५९ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगला तोडून कर्मचाऱ्याने मालकाला मोठा आर्थिक झटका दिला आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना, एका वापरकर्त्याने लिहिले की, प्रामाणिकपणे, आम्ही सध्या ज्या मानसिक आरोग्य संकटात आहोत त्याबद्दल आम्ही पुरेसे बोलत नाही. हे सामान्य वर्तन नाही. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, त्याला चांगला पगार देऊन ठेवायला हवं होतं.