अज्ञात जिवाणुमुळे बटाटा पिकाची नासाडी; शास्त्रज्ञदेखील धास्तावले

बटाट्याचे पीक सध्या धोक्यात आहे. अमेरिकेतल्या पेन स्टेट मधल्या संशोधकांनी बटाटा पिकाचं नुकसान करणा-या जीवाणूंचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. 

Updated: Feb 4, 2024, 10:55 PM IST
अज्ञात जिवाणुमुळे बटाटा पिकाची नासाडी; शास्त्रज्ञदेखील धास्तावले title=

Potato Disease : वेफर्स खायला कुणाला आवडत नाहीत. मसालेदार वेफर्सनी संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकलीय. वेफर्सच्या उद्योगात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र याच वेफर्स उद्योगावर एक नैसर्गीक संकट घोंगावू लागलंय. या संकटामुळे शास्त्रज्ञदेखील धास्तावले आहेत. 

सगळ्यांना चिप्स खायला खूप आवडतात. जगभरात चिप्सची मोठी बाजारपेठ आहे. जेव्हा बटाटा पिकावर परिणाम होतो तेव्हा सर्वात आधी चिप्स उद्योगाला फटका बसतो. मात्र एका नवीन संशोधनानुसार, एक अज्ञात जिवाणू बटाटा पिकाची नासाडी करतोय.अमेरिकेत हे नवीन जीवाणू सापडले आहेत. अगदी युरोपमध्येही बटाटा पिकांवर बॅक्टेरिया आधीच कहर करतोय. ही समस्या वाढली तर जगभरात चिप्सचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटतीय, जी अत्यंत चिंतेची बाब आहे.

जिवाणूंमुळे बटाट्याच्या पिकात फळांमध्ये बॅकलेग आणि मऊ रॉट सारखे रोग

अमेरिकेतल्या पेन स्टेट मधल्या संशोधकांनी बटाटा पिकाचं नुकसान करणा-या जीवाणूंचा एक नवीन प्रकार शोधून काढलाय. अमेरिकेतील बटाटा उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे जगभरातील चिप उत्पादनात फरक पडू शकतो. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातही बटाट्याचं उत्पादन घेतलं जातं, जिथं या जीवाणूचा बटाटा पिकावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते या जिवाणूंमुळे बटाट्याच्या पिकात फळांमध्ये बॅकलेग आणि मऊ रॉट सारखे रोग होतात. यामुळे खराब बटाटे तयार होतात. 

शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, 26 वेगवेगळ्या शेतांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये बटाटे खराब झाल्याचं आढळून आलं. अभ्यासात, शास्त्रज्ञांनी 456 नवीन जीवाणू नमुने ओळखले आहेत. यातील अनेक जिवाणू बटाटा पिकासाठी अत्यंत घातक आहेत. संशोधनात डिकेया सारखी स्ट्रेन आणि पेक्टोबॅक्टेरियमच्या सहा प्रजातींचाही समावेश आहे. यापैकी एक, पेक्टोबॅक्टेरियम अमेरिकेत यापूर्वी कधीच दिसला नव्हता. या संसर्गाची व्याप्ती अमेरिकेबाहेरही वाढू शकते अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय.
अमेरिकेतील बटाटा पिकावर आलेलं संकट जगासाठी धोक्याची घंटा आहे. कारण बटाटा ही केवळ एक भाजी नाही. याचा परिणाम चिप्स उद्योगावर होणार आहे. त्याचबरोबर हे जीवाणू युरोपवरही परिणाम करत आहेत, हे नाकारता येणार नाही. हा अभ्यास सिस्टेमॅटिक अँड अप्लाइड मायक्रो-बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. सध्या नवीन आणि अज्ञात जीवाणूंवर संशोधन सुरू आहे, त्यासोबतच त्याचा प्रसार रोखण्यासाठी उपायही शोधले जात आहेत.