मासिक पाळीची तुलना शहिदांच्या रक्ताशी

इतिर सेन या १८ वर्षाच्या सौंदर्यवतीचे नाव आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 24, 2017, 11:46 PM IST
मासिक पाळीची तुलना शहिदांच्या रक्ताशी  title=

अंकारा : सोशल मीडियावर बेजबाबदार वक्तव्य करणे तुर्कीतील सौदर्यवतीला महागात पडले. इतिर सेन या १८ वर्षाच्या सौंदर्यवतीचे नाव आहे.

इतिरचा मिस तुर्की पुरस्कार देऊन काही दिवसांपूर्वी गौरव करण्यात आला होता. पण दरम्यानच्या काळात तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून बेजबाबदार विधान केले. त्यात मासिक पाळीतील रक्ताची तुलना शहिदांच्या रक्ताशी केली होती. यावरुन तुर्की तसेच जगभरातून तिच्यावर संताप व्यक्त करण्यात येत होता. याचीच परिणीती म्हणून तिचा मिस तुर्की हा किताब काढून घेण्यात आला आहे. हे वादग्रस्त ट्विट व्हायरल झाल्यानंतर आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागला. तिच्याऐवजी या स्पर्धेत रनरअप असलेल्या अस्ली सुमेनला हा पुरस्कार देण्यात आला असून सुमेन चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तुर्कस्थानाचं प्रतिनिधीत्व करणार आहे.

काय आहे प्रकरण ?

तुर्कस्थानात झालेल्या सत्तांतराच्या प्रयत्नात सुमारे २५० जणांना आपले प्राण गमवावे लागले. १५ जुलैला तुर्कस्तानातील सत्तांतराच्या प्रयत्नाचा पहिला वर्धापन दिवस होता. या पार्श्वभूमीवर इतिरने वादग्रस्त ट्विट केले होते.