Perfect Figur : सध्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर वैयक्तिक विकासही तितकाच महत्त्वाचा ठरतोय. त्यामुळे सध्याची पिढी आपल्या फिटनेसकडे (Fitness) विशेष लक्ष देताना दिसतेय. त्यातच महिला असतील तर त्या फिटनेसच्या बाबतीत एक पाऊल पुढे असतात. आकर्षक शरीर आणि सुंदर असा बांधा, परफेक्ट फिगर (Perfect Figure) असावी असं जगातील प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. यासाठी योगा, जिम, ऐरोबिक्स, झुम्बा याबरोबरच योग्य आहार यांचा ताळमेळ साधत महिला स्वत:ला फिट ठेवतात. अभिनय किंवा मॉडलिंग क्षेत्रातील महिला याबाबत जास्त जागरुक असतात.
बॉलिवूडमध्ये (Bollywood) अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या फिटनेसवरुन त्यांच्या वयाचा अंदाज बांधणं कठिण होतं. यात मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय बच्चन, करिष्मा कपूर इतकंच काय तर माधुरी दीक्षित, हेमा मालिनी या अभनेत्रींचा फिटनेस तरुणींना लाजवेल असा आहे.
फरफेक्ट फिगर असणारी महिला
बॉलिवूडमधील या अभिनेत्री सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत आजही तितक्याच जागरुक असल्या तरी तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, या जगातील सर्वात फिट अभिनेत्री नाहीएत. याबाबत बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकत हॉलीवूडच्या (Hollywood) एका अभिनेत्रीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रींनी वयाची चाळीशी पार केली आहे.
या हॉलिवूड अभिनेत्रीचं नाव आहे केली ब्रुक (Kelly Brook). जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब केली ब्रुकच्या नावावर आहे. तिच्या फिटनेसकडून पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येणार नाही. केली ब्रुक आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. 1997 मध्ये केली ब्रुक एका म्युझिक अल्बममध्ये झळकली आणि तिच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला वेड लावलं. तिच्या सौंदर्याच्या चर्चा होऊ लागल्या. केली ब्रुक टीव्हीवर एका कार्यकर्माचं सूत्रसंचालनही करते.
केलीला परफेक्ट फिगरचा किताब बहाल करण्यात आला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे केलीने सुदंर दिसण्यासाठी आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवावर प्लास्टिक सर्जरी केलेली नाही. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्ससच्या एका रिसर्चनंतर 'केली ब्रुक'ला जगातील सर्वात परफेक्ट बॉडी असणारी महिला म्हणून घोषित करण्यात आलं.
रिचर्स कोणत्या आधारावर केला गेला?
हा रिसर्च करण्यासाठी काही नियमावली तयारी करण्यात आली होती. चेहऱ्याचा आकार, शरीर आणि केसांची लांबी, वजन या सर्व पॅरामीटरवर आधारित हा रिसर्च होता. या रिचर्समध्ये काही महिलांचा समावेश करण्यात आला होता. यात केली ब्रुकने बाजी मारली. सध्या सुंदर दिसण्यासाटी लाखो रुपये खर्चुन प्लॅस्टिक सर्जरी केली जाते. पण केली ब्रुक याला अपवाद आहे.
ब्रिटनच्या फॅशन मॅगझीनने FHM ने 2005 केली ब्रुकला 'सेक्सिएस्ट वूमन ऑफ द इयर' म्हणून नावाजलं होतं. फिटनेसबरोबर वैयक्तिक आयुष्यासातही केली ब्रुक चर्चेत असते. 2020 मध्ये वाढल्या वजनामुळे तिला ट्रोल करण्यात आलं. पण केली ब्रुकने कठोर मेहनत करत पुन्हा आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं.