Elon Musk Tweets Rules : एलॉन मस्कने Twitter चे नियम बदलले, जाणून घ्या नवीन नियम

एलॉन मस्कचा ट्विटरच्या नियमात मोठा बदल, 'हे' असतील आजपासून नवीन नियम

Updated: Nov 7, 2022, 11:40 PM IST
Elon Musk Tweets Rules : एलॉन मस्कने Twitter चे नियम बदलले, जाणून घ्या नवीन नियम  title=

मुबई : Elon Musk Tweets Rules टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) आता ट्विटरचे नवीन बॉस बनले आहेत. ट्विटरचे बॉस बनल्यानंतर मस्क यांनी अनेक धडाकेबाज निर्णय़ घेतले आहेत.त्यात आता ट्विटरच्या नियमांबाबतही त्यांनी मोठा निर्णय़ घेतला आहे. ट्विटरचे अनेक नियम त्यांनी बदलले आहेत.त्यामुळे आता नवीन नियम काय असणार आहेत, ते जाणून घेऊयात. 
 
एलॉन मस्कने (Elon Musk) नुकताच ट्विटरच्या ब्लू टिकच्या नियमात बदल केला होता. यानंतर आता एलॉन मस्कने ट्विटरचे नियम बदलले आहेत.या नवीन नियमांमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची गोपनीयता, सुरक्षितता आणि सत्यता यासंबंधी अनेक बदल केले जात आहेत. य़ा संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.  

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटमध्ये सांगितले की, त्याचे नियम काळानुसार बदलत राहतील. यातील बहुतांश नियम हे पूर्वीसारखेच नियम आहेत, परंतु त्यात काही नवीन नियम देखील जोडले गेले आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे ट्विटरवरील सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

बदलले नियम काय ? 

माहितीनुसार, हिंसेबाबत सेफ्टी फीचरमध्ये असे म्हटले आहे की, तुम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा लोकांच्या समूहाविरुद्ध हिंसाचाराची धमकी देऊ शकत नाही. आम्ही हिंसाचाराचा गौरव करणे देखील बंद करतो.

याशिवाय, नवीन नियमांनंतर, तुम्ही दहशतवाद किंवा हिंसक अतिरेक्यांना धमकावू किंवा प्रोत्साहन देऊ शकत नाही. तसेच बाल लैंगिक शोषण यावर Twitter शून्य सहिष्णुता धोरण आहे. तुम्ही कोणाच्याही लक्ष्यित छळात गुंतू शकत नाही किंवा इतर लोकांना असे करण्यास प्रवृत्त करू शकत नाही.

...तर अकाऊंट ब्लॉक 

नवीन नियमांबद्दल बोलताना, यात व्यक्ती, गट किंवा संस्थांना इतरांची दिशाभूल, दिशाभूल किंवा फसवणूक करण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत. असे कोणी करताना आढळल्यास त्याचे खाते बंद केले जाईल. याशिवाय त्यांनी व्हिडिओ पोस्टिंगबाबतचे नियमही बदलले आहेत.

दरम्यान अशाप्रकारे एलॉन मस्क (Elon Musk Tweets Rules) यांनी ट्विटरचे नियम बदलले आहेत. आता हे युझर्सना किती पटतात, हे पहावे लागणार आहे.