Railway: या ट्रेनमधून 20 तासांचा प्रवास करणं म्हणजे "खतरों के खिलाडी" सारखा अनुभव, प्रवाशांना...

जगातील काही ट्रेनमधून प्रवास करताना जीवाची बाजी लावावी लागते, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मॉरीतानिया (Mauritania) देशात ट्रेनचा प्रवास असाच काहीसा आहे.

Updated: Nov 7, 2022, 09:39 PM IST
Railway: या ट्रेनमधून 20 तासांचा प्रवास करणं म्हणजे "खतरों के खिलाडी" सारखा अनुभव, प्रवाशांना... title=

Longest Train In World: रेल्वेनं प्रवास करणं सर्वात सुरक्षित प्रवास म्हणून मानलं जातं. रेल्वे ट्रॅकवरून गाडी आपल्या गतीने पुढे जात असते. त्यामुळे रस्ते वाहतुकीच्या तुलनेत लवकर आणि सुरक्षितरित्या इच्छितस्थळी पोहोचतो. जगातील काही ट्रेनमधून प्रवास करताना जीवाची बाजी लावावी लागते, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मॉरीतानिया (Mauritania) देशात ट्रेनचा प्रवास असाच काहीसा आहे. मॉरीतानिया देशातील मालगाडीत (Freight Train) असाच काहीसा अनुभव येतो. 200 डब्ब्यांच्या या ट्रेनमध्ये एक डब्बा प्रवाशांसाठी असतो. मात्र यातून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखं आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी ना सीट्स असतात, ना टॉयलेट..त्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करणं कठीण (Troubles) होऊन बसतं. 

ट्रेनमधून प्रवास करणं त्रासदायक असलं तरी रस्ते वाहतुकीच्या तुलनेत 500 किमी अंतर कमी होतं. त्यामुळे वेळेची बचत होते. त्यामुळे हा प्रवास कितीही खडतर असला तरी लोकं ट्रेनमधून जाणं पसंत करतात. महत्त्वाचं काम उरकण्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटण्यासठी या ट्रेनमधून प्रवासाला पसंती देतात. बीबीसीमधील एका रिपोर्टनुसार या डब्ब्यातून प्रवास करण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. 

Viral Video: वाढत्या क्राईमबाबत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना पोपटानं केली चोरी, घटना कॅमेऱ्यात चित्रित

ही ट्रेन आफ्रिकी देशात चालते आणि 1963 साली सुरु करण्यात आली होती. या ट्रेनचं नाव ट्रेन टू डेजर्ट असं आहे. ही ट्रेन 20 तासात 704 किमी अंतर कापते. सहारा वाळवंटातून जाणाऱ्या या ट्रेनची लांबी 2 किमी इतकी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं तापमान 49 डिग्री सेल्सिअस ते शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं.