'ट्विटर'वर वादग्रस्त वक्तव्य, नोकरीला मुकावं लागलं

त्यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला निशाण्यावर घेत इस्लामविरोधी ट्विट केलं होतं

Updated: Jun 14, 2018, 03:14 PM IST
'ट्विटर'वर वादग्रस्त वक्तव्य, नोकरीला मुकावं लागलं title=

मुंबई : दुबईस्थित जेडब्ल्यू मेरियट हॉटेलचे स्टार शेफ यांना आपल्या सोशल मीडियावर केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर आपल्या नोकरीला मुकावं लागलंय. शेफ अतुल कोचर यांनी आपल्या ट्विटमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला निशाण्यावर घेत इस्लामविरोधी ट्विट केलं होतं. त्यानंतर हॉटेल त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. 

रविवारी, प्रियांका चोप्रा हिला संबोधत 'गेल्या २००० वर्षांपासून इस्लामकडून त्रास दिल्या जाणाऱ्या हिंदूंच्या भावनांचा तू अपमान केलास... तुला स्वत:ची लाज वाटायला हवी' असं ट्विट कोचर यांनी केलं होतं... 

आपली चूक लक्षात येताच त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आणि त्यावर स्पष्टीकरणही दिलं... परंतु याचा त्यांना उपयोग झाला नाही, असंच म्हणावं लागेल.

'माझ्या ट्विटसंबंधी कोणतंही स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत नाही. रविवारी क्षणिक भावनांच्या आहारी जाऊन माझ्याकडून ही चूक झाली. मला माझी चूक उमगलीय... आणि मी त्यासाठी माफी मागतो. मी इस्लामोफोबिक नाही... मला माझ्या वक्तव्यांवर खेद आहे...' असं म्हणत त्यांनी आपल्या चुकीची माफिही मागितली होती. परंतु, ट्विट डिलीट केल्यानंतर आणि माफी मागितल्यानंतरही दुबईस्थित हॉटेलनं त्यांना बुधवारी घरचा रस्ता दाखवला. 

अतुल यांना लंडन स्थित बनारस रेस्टॉरन्टसाठी २००७ साली मिशेलिन स्टार अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं होतं.