Donald Trump : 'आम्ही घाबरणार नाही, देवाने आम्हाला...', जीवघेण्या हल्ल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

Donald Trump Statement : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला झाला. प्रचारसभेत भाषण करताना ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्यात (Assassination Attempt) आली. त्यानंतर आता ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आलीये.

सौरभ तळेकर | Updated: Jul 14, 2024, 10:48 PM IST
Donald Trump : 'आम्ही घाबरणार नाही, देवाने आम्हाला...', जीवघेण्या हल्ल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? title=
Donald Trump Statement On Assassination Attempt

Donald Trump assassination attempt : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर शनिवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला झाला. पेनिन्सिल्वियामध्ये भर प्रचारसभेत भाषण करत असताना ट्रम्प (Assassination Attempt) यांच्यावर फायरिंग झालं. ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी अगदी चाटून गेली. ते जखमी झाले. त्यांच्या कानातून रक्त वाहू लागलं. हल्ल्यानंतर ट्रम्प पोडियमचा आडोसा घेऊन तत्काळ खाली बसले. सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला आणि सुरक्षितस्थळी नेलं. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्यामागे गर्दीत उभ्या असलेल्या एका समर्थकाचा या गोळीबारात मृत्यू झाला. अशातच आता जीवघेण्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Statement) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले Donald Trump?

काल तुमचे विचार आणि प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार, कारण केवळ देवानेच अकल्पनीय घडण्यापासून रोखलं. आम्ही घाबरणार नाही, परंतु त्याऐवजी आमच्या विश्वासात लवचिक राहू आणि दुष्टपणाचा सामना करू नका. आमचं प्रेम इतर पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांवर आहे. जे जखमी झाले त्यांच्या प्रकृतीसाठी आम्ही प्रार्थना करतो आणि ज्या नागरिकाचा मृत्यू झाला होता, त्यांची आठवण आमच्या हृदयात जपून ठेवतो, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

या क्षणी, आपण एकजुटीनं उभं राहणं आणि अमेरिकन म्हणून आपलं खरं पात्र दाखवणं, मजबूत आणि दृढनिश्चयी राहणं आणि वाईटाला जिंकू न देणं हे नेहमीपेक्षा महत्त्वाचं आहे. मला आपल्या देशावर मनापासून प्रेम आहे आणि मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि या आठवड्यात विस्कॉन्सिनमधून आमच्या महान राष्ट्राशी बोलण्यास उत्सुक आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले...

मला पेनसिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे. ते सुरक्षित आहेत आणि काम करत आहे हे ऐकून मी कृतज्ञ आहे. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे, कारण आम्ही पुढील माहितीची वाट पाहत आहोत, असं जो बायडेन म्हणाले. जिल आणि मी सीक्रेट सर्व्हिसचे आभारी आहोत की ते त्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवतात. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आपण एक राष्ट्र म्हणून संघटित झाले पाहिजे, असं जो बायडेन यांनी म्हटलं आहे.