Donald Trump यांनी अखेर पराभव केला मान्य; सत्ता हस्तांतरण प्रक्रियेला दिली परवानगी

अमेरिकन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले

Updated: Nov 24, 2020, 02:27 PM IST
Donald Trump यांनी अखेर पराभव केला मान्य; सत्ता हस्तांतरण प्रक्रियेला दिली परवानगी  title=

मुंबई : अमेरिकेत नुकतीच राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांना बायडनकडून पराभव स्विकारावा लागलं. अमेरिकेतील जनतेने बायडन (Jo Biden) यांना नवे राष्ट्रपती म्हणून निवडले आहे. मात्र निवडुणकीचा निकाल जाहीर होऊनही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पद सोडलेले नाही. ट्रम्प यांनी अद्याप आपला पराभव स्विकारलेला नव्हता. मात्र आता ट्रम्प यांनी अमेरिकेतील सत्ता हस्तांतरण प्रक्रियेला परवानगी दिली आहे. 

अमेरिकन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. यादरम्यान त्यांनी जो बायडन यांच्यावर अनेकवेळा टीका केली. आता सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु झाली असल्याने त्याला डोनाल्ड ट्रम्प मंजुरी देतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनरल सर्व्हिस ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनला सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की प्रक्रियानुसार जे काही करणे आवश्यक आहे ते केले पाहिजे. त्यानंतर जनरल सर्व्हिस ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचे प्रमुखांनी जो बायडन यांना पत्र लिहून त्यांना सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण दिले आहे.

जो बायडन यांना निमंत्रण 

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनरल सर्विस ऑफ ऍडमनिस्ट्रेशनला सत्ता हस्तांतरण प्रक्रियेला परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की,'जे करायला हवं ते करा.' यानंतर अमेरिकेच्या GSA म्हणजे जनरल सर्विस ऍडमिनिस्टेटक एमिलि मर्फीने जो बायडन यांना चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांना सत्ता हस्तांतरणासाठी निमंत्रण दिलं आहे.