23 वर्षांची तरूणी, 63 वर्षांचा नवरा, सोशल मीडियात लव्ह बर्ड्सचा धुमाकूळ!

म्हणतात ना...प्रेम आंधळं असतं. प्रेमाला वय, जात, धर्म, प्रांत, वंश, देश अशा कोणत्याही बंधनांची मर्यादा नसतं, असेच David simonini आणि Willow Silas दोघं...

Updated: Oct 16, 2022, 12:42 AM IST
23 वर्षांची तरूणी, 63 वर्षांचा नवरा, सोशल मीडियात लव्ह बर्ड्सचा धुमाकूळ! title=

David simonini willow : 23 वर्षांची मॉडेल विलो सिलास (Willow Silas)...कुणीही प्रेमात पडावी अशीच, पण विलोचा जीव भलत्यावरच जडलाय... त्याचं नाव आहे डेव्हिड सिमोनीनी (David Simonini). डेव्हिडचं वय अवघे 63 वर्ष... या दोघांमध्ये तब्बल 40 वर्षांचं अंतर आहे. मात्र, या दोघांनी सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घातलाय.

या जोडप्याची भेट टिंडर (Tinder) या डेटिंग ऍपवर (Dating App) झाली. पहिल्याच भेटीत दोघं एकमेकांच्या प्रेमात जडलं आणि मग काय वयाची बंधनं झुगारून दोघही लग्नाच्या बेडीत अडकले. हे दोघं कधी रेस्टॉरंटमध्ये दिसतात तर कधी गार्डनमध्ये फिरताना पहायला मिळतात.

या दोघांच्या फोटोजनी सोशल मीडियात (Social Media) चांगलाच धुमाकूळ घातलाय...विलो आणि डेव्हिडचं हे प्रेम पाहून नेटीझन्सचा मात्र जळफळाट झालाय. अनेकजण या जोडीला ट्रोलही करतात, कुणी डेव्हिडला आजोबा म्हणतं तर कुणी शुगर डॅडी... मात्र या जोडप्याला त्यानं काहीही फरक पडत नाही.

आणखी वाचा - बुर्ज खलीफाचा 'हा' Viral Video पाहिलात का? पाहून तुम्ही म्हणाल अद्भूत

म्हणतात ना...प्रेम आंधळं असतं. प्रेमाला वय, जात, धर्म, प्रांत, वंश, देश अशा कोणत्याही बंधनांची मर्यादा नसते. विलो आणि डेव्हिड यांच्याकडे पाहिल्यानंतर हेच दिसून येतंय. विलो आणि डेव्हिडचे फोटो सोशल मीडियावर (David simonini willow) व्हायरल होत असतात. मात्र, हे नातं कायम रहावं, यासाठी नेटिझन्स प्रार्थना करत आहेत.