Covid-19: तीन महिन्यात तीन लाटा! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही

Omicron Subvariant in China : ओमायक्रॉनच्या दोन सब व्हेरिएंट BA.5.2 and BF.7 आढळले, ही लक्षण दिसताच व्हा सावध

Updated: Dec 20, 2022, 05:44 PM IST
Covid-19: तीन महिन्यात तीन लाटा! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही title=

Coronavirus in China: जगभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. पण चीनमध्ये (China) कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. कोरानामुळे लाखो लोकांना घरात कैद करण्यात आलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीनची राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) जवळपास 70 टक्के जनता कोविडच्या (Covid-19) विळख्यात अडकली आहे. वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. 

ओमायक्रॉनचे नवे 2 व्हेरिएंट
चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रोच्या 2 नव्या सब व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हात पाय पसरले आहेत. चीनच्या अनेक शहरातील रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे बीए.5.2  आणि बीएफ.7 हे सब व्हेरिएंट आढळले आहेत. या दोन व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

बीजिंगमध्ये BF.7 व्हेरिएंटचा उद्रेक
चीनची राजधानी बीजिंगमध्ये (Coronavirus in Beijing) ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 (Omicron Subvariant BF.7) ने धुमाकूळ घातला आहे. अनेक रुग्णांमध्ये या व्हेरिएंटची लक्षणं आढळली आहेत. यामुळे बीजिंगमधील आरोग्य व्यवस्था पुरती ढासळली असून रुग्णालयाबाहेर उपचारासाठी रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

ही तीन लक्षणं दिसल्यास व्हा सावध
चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट बीए.5.2 आणि बीएफ.7 हा वेगाने पसरत आहेत. पण दिलासादायक म्हणजे नवा व्हेरिएंट जीवघेणा नाहीए. उपचारानंतर रुग्ण बरे होत असून मृत्यूची संख्या खूप कमी आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णांमध्ये घशाचा त्रास, अंगदुखी आणि अति ताप ही लक्षणं दिसतात. 

चीनमध्ये तीन महिन्यात तीन लाटा
चीनचे तज्ज्ञ वू जुन्यो यांनी पुढच्या तीन महिन्यात कोरोनाच्या तीन लाटा येण्याची भीती व्यक्त केली आहे. चीन सध्या पहिल्या लाटेचा सामना करत आहे. 15 जानेवारीच्या आसपास कोरोनाचा कहर आणखी वाढू शकतो. 21 जानेवारीला चीनचा लूनार न्यू इयरला सुरुवात होत आहे, यावेळी लोकं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतील. यानंतर दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाटेची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

चीनमध्ये बिकट परिस्थिती
चीनमध्ये कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात कर्मचारी कमी आणि रुग्ण जास्त झाले आहेत. अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज थांबायचं नाव घेत नाहीए. रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या असून औषधांचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. मृत्यूचा आकडा वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा उपलब्ध नाही. नातेवाईकांना जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक दिवसांची वाट पहावी लागत आहे.