कोरोनाचे नवे संकट ! या देशात मास्क मुक्तीनंतर आता पुन्हा मास्कची सक्ती

आता डेल्टा वेगाने जगभर पसरतो आहे. नवा विषाणू अवतार इस्त्रायलमध्ये सापडला आहे. त्यामुळे या देशाने पुन्हा मास्कची सक्ती करण्याचे आदेश दिले आहे. 

Updated: Jun 25, 2021, 10:05 PM IST
कोरोनाचे नवे संकट ! या देशात मास्क मुक्तीनंतर आता पुन्हा मास्कची सक्ती title=

मुंबई : भारतात डेल्टाचा व्हेरियंट (Delta varient) सापल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात Delta ची दहशत दिसून येत आहे. 21 डेल्टाचे रुग्ण सापडले तर रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टाचा पहिला बळी गेला आहे. आता हा डेल्टा वेगाने जगभर पसरतो आहे. नवा विषाणू अवतार इस्त्रायलमध्ये सापडला आहे. त्यामुळे या देशाने पुन्हा मास्कची सक्ती करण्याचे आदेश दिले आहे. कोरोनावर (coronavirus ) मात मिळविल्यानंतर इस्त्रायलने मास्क बंदी उठवली होती. मास्क मुक्तीनंतर आता पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. (Israel brings back mask rules as variant spreads)

कोरोनावर (Coronavirus) मात करणारा आणि सर्वप्रथम मास्कमुक्ती (Mask Free) करणारा देश म्हणून इस्त्रायलने (Israel) जगात आपला डंका गाजवला होता. मात्र, हाच देश आता डेल्टाच्या नव्या अवताराने घाबरला आहे. पुन्हा एकदा नागरिकांना चेहऱ्यावर मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. सध्या जगभर दहशत पसरवत असलेला कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट पसरत आहे. (Delta Varient) जगातील अनेक देशांमध्ये पसरत असलेल्या डेल्टाचे (Delta) काही रुग्ण इस्त्रायलमध्येही आढळले आहेत. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी (Public Places) मास्क वापरण्याचे आदेश जारी केले आहेत.

परदेशी नागरिकांना बंदी, विमानतळावर तपासणी

आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या नागरिकांमुळे डेल्टा व्हायरस इस्त्रायलमध्ये आल्याचे पंतप्रधान नफ्ताली यांनी म्हटले आहे. त्यामुळे विमानतळावर यापुढे कोरोना चाचणी आणि विलगीकरण यांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर अन्य देशातील नागरिकांना देशात बंदी करण्यात आली आहे.

कोरोनाचा डेल्टा व्हायरस हा सर्वप्रथम भारतात आढळला आणि त्यानंतर तो जगभर पसरला. या व्हायरसची सगळ्यांनाच धास्ती लागून राहिली आहे. दरम्यान, इस्त्रायलमध्ये बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र लस घेतलेल्या नागरिकांनाही डेल्टा व्हायरसची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. इस्त्रायलमध्ये आतापर्यंत 8 लाख 40 हजार 225 नागरिकांना कोरोना झाला. त्यापैकी 6,428 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुन्हा कोरोनाचा धोका

इस्त्रायलमध्ये एकाच दिवसात 100 पेक्षा अधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणांवर मास्क वापरणे आता बंधनकारक करण्यात येत असल्याची घोषणा रेडिओवरुन करण्यात आली आहे. कोरोना टास्कफोर्सचे प्रमुख नचमन ऐश यांनी इस्त्रायली सरकारी रेडिओ केंद्रावरून ही घोषणा केली.

कोरोना लसीकरणावर भर

 इस्त्रायलमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सक्तीदेखील हटवण्यात आली होती. मात्र 18 वर्षांखालील नागरिकांचं लसीकरण झालेले नसल्यामुळे त्यांना डेल्टा व्हेरिअंटचा अधिक धोका असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्यात येत आहे.