धक्कादायक : जगात २ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

एकट्या अमेरिकेत ५४ हजार २६५ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.   

Updated: Apr 26, 2020, 05:44 PM IST
धक्कादायक : जगात २ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी title=

मुंबई :  जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. आतापर्यंत जभरात कोरोनामुळे २ लाख ३ हजार ७०३ लोकांचा बळी गेला आहे. तर संपूर्ण  जगात २९ लाख ३६ हजार ३८६ नागरिकांना कोरोनाची लागण झली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचं सावट अधिकाधिक गडद होत चाललं आहे. त्याचप्रमाणे देशभरात ८ लाख ४१ हजार २८६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे रूग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत.

भारतात देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारतात आतापर्यंत २६ हजार ४९६ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ५ हजार ९३९ रुग्ण सुखरूप कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. त्याशिवाय १९ हजार ७३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अमेरिकेत बळींची संख्या ५४ हजार २६५ वर पोहोचली आहे.  तर तब्बल ९ लाख ६० हजार ८९६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १ लाख  १८  हजार १६२ रुग्ण सुखरूप बरे झाले आहेत. तर ७ लाख ८८ हजार ४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

स्पेनमध्ये २ लाख २३ हजार ७५९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये २२,९०२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीत १ लाख ९५ हजार ३५१ लोकं कोरोनाबाधित असून २६,३८४ लोकांचा मृत्यू झालाय.   फ्रान्समध्ये १ लाख ६१ हजार ४८८ कोरोनाग्रस्त आढळले असून २२ हजार ६१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.