वुहान : चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी अनेक जणांनी आपल्या प्राणाचं बलिदान देण्यास सुरूवात केली आहे. काहीही झालं तरी चालेल, पण कोरोना व्हायरसला हरवायचंच असा चंग चीनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांपासून डॉक्टरांनी देखील बांधला आहे.
तुम्हाला धक्का बसेल आतापर्यंत वुहानमध्ये एकूण १७०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा देताना आपला जीव गमावला आहे. यात डॉक्टर आणि नर्स यांचा देखील समावेश आहे.
आपला जीव धोक्यात आहे, हे माहित असतानाही दुसऱ्यांना औषधोपचार करण्याचं काम या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुरूच ठेवलं आहे. इतर रूग्ण बरे झाले आहेत, पण दिवसेंदिवस संपर्क येतच असल्याने काहींचा आजार बळावल्याने त्यांना मृत्यूला कवटाळावं लागलं आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरस असा काही पसरला आहे की, वाचवणारे देखील वाचू शकत नाहीत. चीनच्या न्यूज पेपर्सने बातमी दिली आहे की, वुहान हॉस्पिटलचे डायरेक्टर लीऊ जीमिंग यांचा देखील मृत्यू झाला आहे.
वुहानच्या या हॉस्पिटलमध्ये सर्वात आधी कोरोना व्हायरस ओळखला गेला होता. तसेच या हॉस्पिटलचे डॉक्टर ली वेनलियांग यांनी असा व्हायरस असल्याचा शोध लावला होता, पण त्यांचा देखील मृत्यू झाला आहे.
महत्त्वाचं म्हणजे चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरणे बंद झालेलं नाही. कोरोना व्हायरसमुळे मंगळवारी १ हजार ८६८ लोकांचा मृत्यू झाला आहे, याशिवाय ७२ हजार ४३६ जण यामुळे बाधित झाले आहेत.