VIDEO: इमारतीवरुन एक नाही तर दोनवेळा पडली महिला, सुदैवाने बचावली

असं म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. एका बहुमजली इमारतीवरुन एक महिला खाली कोसळली आणि सुदैवाने या अपघातातून ती बचावली.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 14, 2017, 09:20 PM IST
VIDEO: इमारतीवरुन एक नाही तर दोनवेळा पडली महिला, सुदैवाने बचावली title=

नवी दिल्ली : असं म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय एका महिलेला आला आहे. एका बहुमजली इमारतीवरुन एक महिला खाली कोसळली आणि सुदैवाने या अपघातातून ती बचावली.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

चीनमधील एका बहुमजली हॉटेलच्या इमारतीवरुन एक महिला खाली कोसळली आणि चमत्कारिक रुपाने ती बचावली.

ही महिला इमारतीमधून एक वेळा नाही तर दोन वेळा खाली कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

४६ सेकंदांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक महिला हॉटेलवरुन खाली कोसळताना दिसत आहे. 

झालं असं की, ७ डिसेंबर रोजी उत्तर चीनमधील यैनशॉ काऊंटीमध्ये एका हॉटेलवरुन खाली कोसळली. हॉटेलच्या ९व्या मजल्यावरुन ही महिला टॅरेसवर कोसळली. त्यानंतर ही महिला हळूहळू पुढे सरकत आली आणि मग खाली कोसळत असल्याचं पाहिल्यानंतर तेथे उपस्थितांनी तिला पकडलं.

या अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.