नवी दिल्ली : 1962 आणि 2017 सालातला भारत वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरूण जेटलींच्या विधानाला चीननं उत्तर दिलंय. भारत जसा बदलला आहे, तसा चीनही बदलला आहे अशी दर्पोक्ती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी केलीये.
डोकलाममधून भारतीय सैन्य माघारी गेल्याशिवाय चर्चा होणार नाही, अशी आडमुठी भूमिकाही चीननं घेतली आहे. डोकलाम हा चीनचा नव्हे, तर भूतानचा भूभाग आहे. मात्र या भागात हडेलहप्पी करून चीननं रस्त्याचं काम सुरू केल्यामुळे सिक्कीममध्ये भारतीय जवानांनी त्याला अटकाव केला.
भूताननंही चीनच्या या घुसखोरीविरोधात निषेध नोंदवला आहे. मात्र भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. भारतानं या भागात सैन्याची अतिरिक्त कुमक रवाना करून चीनला जोरदार इशारा दिलाय.