चीनचा काही नेम नाही! मिसाईल टाकायचे होते तैवानवर, पडले जपानवर

चल गए तो चांद तक, नहीं चले तो शाम तक, मिसाईलचा रस्ताच चुकला... जाना था तैवान, पहुँच गए जपान! ही चूक चीनला पडणार महाग  

Updated: Aug 4, 2022, 09:13 PM IST
चीनचा काही नेम नाही! मिसाईल टाकायचे होते तैवानवर, पडले जपानवर title=

टोकियो : चीनने तैवानच्या जवळ मिसाईल दागले होते. आता पुन्हा एकदा चीनकडून मिसाईल हल्ला करण्यात आला. मात्र घडलं काहीतरी भलतंच. चीनला मिसाईल टाकायचं होतं तैवानवर पण नेमकं पडलं जपानवर आणि एकच खळबळ उडाली. चीनचे मिसाईल जपानमध्ये पडले. चीनला ही एक चूक महागात पडण्याची शक्यता आहे. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात चीनची 5 मिसाईल पडल्याची माहिती मिळाली आहे. ज्याचा विरोध जपानने केला आहे. जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी याबाबत माहिती दिली. 

जपानच्या ईईझेडमध्ये पाच चिनी क्षेपणास्त्रे पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असं नोबुओ किशी म्हणाले. आता जपान यावरून कोणती भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

नेमकं काय घडलं?
चीन आणि तैवानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची चिन्ह आहेत. चीननं युद्धाभ्यासादरम्यान तैवानवर हवाई हल्ले केले आहेत. चीनचं समुद्रात युद्धाभ्यास वाढवला आहे. त्यामुळे आधीच तणाव निर्माण झाला. आता चीननं या अभ्यासादरम्यान थेट तैवानच्या किनारपट्टीवर मिसाईल डागले आहेत.

यामुळे तिथली परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यामुळे चीनच्या संतापाचा उद्रेक झाला होता. पेलोसी तैवानमधून गेल्यानंतर आता चीननं अधिकच आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चीन आणि तैवानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.