VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?

Trending News In Marathi: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 31, 2024, 01:07 PM IST
VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही? title=
CCTV Video Shows Guard Welcoming Invisible Guests At 3 AM

Trending News In Marathi: सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी हे व्हिडिओ माहितीपर असतात तर कधी विचार करायला लावणारे. अनेकदा या व्हायरल व्हिडिओमुळं फायदाही होतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळं नेटकऱ्यांना पुरतं चक्रावून टाकलं आहे. एका ऑफिसमधला हा व्हिडिओ असून यात एक सिक्युरिटी गार्डचे वागणे कोड्यात टाकणारे आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

सोशल मीडियावर एक सीसीटिव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्याचे कारणही भयंकर आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. यात एक सिक्युरिटी गार्ड एका अशा व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहे जो खरंतर अस्तित्वातच नाही. कोणालाच ती व्यक्ती दिसत नाहीये. व्हिडिओच्या सुरुवातीलाच गार्ड एका खुर्चीत बसला आहे. त्यानंतर पुढच्याच सेंकदाला दरवाजा ओपन होतो. मात्र दरवाजातून आत येताना कोणीच दिसत नाहीये. 

मात्र, सिक्युरिटी गार्ड लगबगीने उठून पुढे जात आहे. अचानक लाइन डिव्हायडर काढून समोर एखादा व्यक्ती उभा आहे त्याला आत येण्यास सांगत आहे. जसं की त्याला कोणीतरी तिथे आलेलं समजलं आहे. 38 सेकंदाच्या या व्हिडिओमुळं लोकांनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. कारण व्हिडिओत कोणच दिसत नाहीये. मग अशात गार्ड कोणासोबत बोलत आहे, असा प्रश्न पडला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ जुना आहे. 2022 मध्ये अर्जेंटिनाच्या ब्यूनर्स आयर्समधील प्रायव्हेट केअर सेंटरमध्ये फिनोचियेटो सेनेटोरियममध्ये रात्री 3 वाजता ही घटना घडली होती. या व्हायरल व्हिडिओनंतर रुग्णालयानेदेखील स्पष्टीकरण दिलं होतं. रुग्णालयाने म्हटलं आहे की, दरवाजा खराब होता. रात्री अनेकदा हा दरवाजा उघडतो व बंद होतो. 

रुग्णालयाने जरी यावर स्पष्टीकरण दिले असले तरी गार्ड कोणाशी बोलत होता. कारण व्हिडिओत काहीच स्पष्ट दिसत नव्हते. व्हिडिओत गार्ड त्या अदृश्य व्यक्तीसाठी व्हिलचेअरदेखील घेऊन येताना दिसत आहे. सोशल मीडियावरदेखील वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. नक्की हा काय प्रकार आहे याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप ठोस माहिती काहीच समोर आलेली नाही. 

सोशल मीडिया युजर्सने व्हिडिओत कमेंट केल्यानुसार, हा एक प्रँक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर एकाने म्हटलं आहे की तो सुरक्षा रक्षक कंटाळला होता. म्हणून तो सहजच कोणाची मदत करण्याची अॅक्टिंग करत होता. 

(सदर व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत असून झी 24 याची खातरजमा करत नाही)