कार आणि बाइक अपघाताचा थरार; VIDEO पाहून बसेल धक्का

रस्ते अपघातात अनेक लोकांचे जीव गेले आहेत. तर कधी कधी भयानक रस्ते अपघातात कोणाला साधं खरचटत नाही. 

Updated: Aug 21, 2022, 12:57 PM IST
कार आणि बाइक अपघाताचा थरार; VIDEO पाहून बसेल धक्का title=
car and bike accident shocking viral video in social media in marathi

Trending video: भयानक, विचित्र आणि थरार असे अपघाताचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. हे व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. रस्ते अपघात होण्यामागे अनेक वेळा गाडी चालकाची चुकी असते किंवा इतर लोकांच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. रस्ते अपघातात अनेक लोकांचे जीव गेले आहेत. तर कधी कधी भयानक रस्ते अपघातात कोणाला साधं खरचटत नाही. 

देव तारी त्याला कोण मारी!

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओतील अपघात बघून तुमच्या अंगावर शहारा येईल. या भीषण अपघातात बाइकस्वाराला जबरदस्त मार बसला असणार. मात्र मराठीत एक म्हणं आहे ना, देव तारी त्याला कोण मारी. हा अपघात बघून या म्हणीचा प्रतत्य येतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. कार आणि बाइकची जोरदार धडक होते आणि बाइकस्वार दूर रस्त्याच्या कडेला जाऊन पडतो. (car and bike accident shocking viral video in social media in marathi)

या भयानक अपघातातून बाइकस्वार थोडक्यात बचावला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या बाइकस्वाराला एकही जखम झाली नाही. हा व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटतं की, यमराज सुट्टी गेला की काय असं वाटतं. कारण एवढ्या भयानक अपघातातून बाइकस्वार चमत्कारिकरित्या बचावला आहे. 

हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटरवर Crazy Tweets नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा भीषण अपघात पाहून यूजर्स हादरले आहेत.