कळलं का? बूट स्वच्छ करण्यासाठी नव्हे तर 'या' कारणासाठी आहेत Escalators च्या बाजूला ब्रश!

एस्केलेटरच्या बाजूला बसवलेले ब्रश आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे ब्रश तिथे का असतात?

Updated: Aug 21, 2022, 10:45 AM IST
कळलं का? बूट स्वच्छ करण्यासाठी नव्हे तर 'या' कारणासाठी आहेत Escalators च्या बाजूला ब्रश! title=

मुंबई : आपण दररोज अशा अनेक गोष्टी पाहतो ज्यांचा खूप उपयोग होतो, परंतु अशाही काही गोष्टी असतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही किंवा आपल्याला त्यांच्या वापराबद्दल माहिती नसते. अशीच एक गोष्ट म्हणजे एस्केलेटरच्या बाजूला बसवलेला ब्रश. एस्केलेटरच्या बाजूला बसवलेले ब्रश आपण सर्वांनीच पाहिले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे ब्रश तिथे का असतात?

जर तुम्ही असा विचार करत असाल की हे ब्रश फक्त डिझाइनसाठी आहेत किंवा तुम्ही शूज स्वच्छ करण्यासाठी हे ब्रश वापरू शकता तर तुमचं मत चुकीचं आहे. एस्केलेटरच्या बाजूला असलेले ब्रश तुमचे शूज स्वच्छ करण्यासाठी नसतात. 

मॉल किंवा मेट्रोच्या एस्केलेटरवर ब्रशने बूट खेळताना किंवा साफ करताना आपण अनेकदा पाहिले आहे. पण तुम्हाला माहितीये का की, हे ब्रश तुमच्या सुरक्षेसाठी आहेत.

ब्रश असण्याचं कारण?

एस्केलेटरवरील हे ब्रश साईड आणि भिंतीमधील अंतर लपवण्याचं काम करतात. शू लेस किंवा स्कार्फ सारख्या छोट्या गोष्टी या अंतराच्या आत येऊ नयेत म्हणून हे ब्रश आहेत. एस्केलेटरवर अशा गोष्टी अडकल्या तर मशीन खराब होऊ शकते. म्हणूनच ब्रश त्याठिकाणी असतो. अशा परिस्थितीत हातातून किंवा खिशातून एखादी छोटीशी गोष्ट जरी पडली, तरीसुद्धा ती या गॅपमध्ये न जाता ब्रशला आपटून पायऱ्यांवरच थांबते.

याशिवाय एस्केलेटरच्या कडेला कोणी आलं तर पाय अडकून दुखापत होण्याची शक्यता असते. मात्र या ब्रशच्या माध्यमातून तसं होतं नाही. अशा परिस्थितीत हे ब्रश तुमचा अपघात होण्यापासून वाचवतात.