ब्रिटनमध्ये आर्थिक संकट; लोकांनी सोडलं एकवेळचं जेवण; हिवाळ्यातही करावा लागणार 'या' गोष्टीचा सामना

देशातील जवळपास निम्मी कुटुंबे त्यांच्या दैनंदिन आहारात कपात करत आहेत

Updated: Oct 21, 2022, 11:09 AM IST
ब्रिटनमध्ये आर्थिक संकट;  लोकांनी सोडलं एकवेळचं जेवण; हिवाळ्यातही करावा लागणार 'या' गोष्टीचा सामना  title=

रशिया-युक्रेन युद्ध (Russia-ukraine war), सतत वाढत जाणाऱ्या तेलाच्या किमती आणि महागाई (inflation) यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम ब्रिटनमध्ये (britain) झाला आहे. एका अहवालानुसार, वाढत्या महागाईमुळे ब्रिटनमधील (britain) लोक एक वेळचे जेवण सोडत आहेत. हे अलीकडच्या काळातील सर्वात मोठे आर्थिक संकट (financial crisis) म्हटले जात आहे. ब्रिटनमध्ये महागाईचा (inflation) प्रभाव इतका वाढला आहे की, लोकांना दोन वेळची जेवण (Meal) मिळवणही कठीण झाले आहे. या संकटामुळे देशातील जवळपास निम्मी कुटुंबे त्यांच्या दैनंदिन आहारात कपात करत आहेत. (Britain economic crisis deepens due to inflation millions of people are forced to give up one meal)

'विच'च्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे. यूएस सेन्सस ब्युरोनुसार, या वर्षाच्या मध्यभागी ब्रिटनची (britain) लोकसंख्या 5,59,77,178 इतकी होती. जवळपास 3000 लोकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण अहवालानुसार, आर्थिक संकटापूर्वी (financial crisis) पुरेसे आणि पौष्टिक अन्न मिळणे कठीण होत आहे. अहवालात असेही म्हटले आहे की सुमारे 80 टक्के कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबरमध्ये ब्रिटनमध्ये (britain) महागाई (inflation) 10 टक्क्यांहून अधिक झाली आहे. त्याच वेळी, किरकोळ किंमत निर्देशांक 12.6 टक्क्यांवर पोहोचला, जो ऑगस्टमध्ये 12.3 टक्के होता.

ऊर्जेच्या (energy) किमती वाढल्याने ब्रिटनमधील आर्थिक संकट अधिकच वाढले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे गॅस, पेट्रोलियम पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर विजेचे दरही वाढले आहेत. ऊर्जेच्या (energy) किमती वाढल्याने विविध वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अहवालानुसार, ब्रिटनमधील (britain) आर्थिक आणि ऊर्जा संकटामुळे लाखो लोक या हिवाळ्यात (winter) त्यांचे घर पुरेसे उबदार ठेवू शकणार नाहीत. अशाप्रकारे, जेवण कमी करण्याबरोबरच त्यांना थंडीचा अधिक फटका सहन करावा लागणार आहे.

नवीन चलनवाढीनुसार ब्रिटनमधील महागाई 1982 च्या सुरुवातीपासून सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. या कालावधीत, जुलै 2022 मध्येही महागाईने या पातळीला स्पर्श केला. सांख्यिकी कार्यालयाने सांगितले की, सप्टेंबरमध्ये महागाई वाढण्यात खाद्यपदार्थांचा मोठा वाटा आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या काळात अन्नधान्य महागाई 14.5 टक्क्यांवर पोहोचली आहे. 1980 नंतरची अन्नधान्याची ही सर्वाधिक महागाई आहे. महागाईचा हा उच्चांक पाहता बँक ऑफ इंग्लंडकडून धोरणात्मक व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. ब्रिटीश मध्यवर्ती बँक महागाई 2 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करत आहे पण आतापर्यंत ती अपयशी ठरली आहे. 

दरम्यान, लिझ ट्रस यांनी गुरुवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्या म्हणाल्या की, संपूर्ण देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना आपण देशाच्या पंतप्रधान झालो आहोत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लिझ ट्रस यांना त्यांच्या पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे मानले जात आहे. यासह, ब्रिटनमधील सर्वात कमी पंतप्रधान असलेल्या लिझ ट्रसचे नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.