Viral Video: लग्न म्हणजे वधू-वरासोबत त्या कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण असतो. लग्न म्हटलं की नाचगाणे आणि जेवणावर ताव. अनेक लोक लग्नाला फक्त खास जेवण्यावर ताव मारायला जातात. या सोहळ्यातील अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद होत असतात. लग्नात कॅमेरा हा पाहुण्यांसोबत सगळ्यात जास्त फोकस असतो तो वधू आणि वरावर. अशाच एका लग्नातील वधूची स्टाइल कॅमेरात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान पसंतीस पडतो आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वधू आणि वर जेवणाच्या टेबलवर मोठ्या थाटामाटात बसले आहेत. पण अचानक नवरीने जे काही केलं त्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. लग्नातील स्वादिष्ट्य जेवणाचा आनंद घेत असताना वधू अचानक नाचायला लागली. याक्षणी तिला वाटलं आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही. सगळे जेवण्यात बिझी आहेत. मात्र तिथे असलेल्या एका कॅमेऱ्याने नवरीचा हा डान्स कैद केला. जेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण डान्स करताना कॅमेऱ्यात कैद झालो आहोत, तेव्हा ती जोरदार हसायला लागली.
या व्हिडीओमधील वधूची बेफिकीर स्टाइल यूजर्सला पसंत पडत आहे. नववधूची ही स्टाइल लोकांना आवडत असून हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आलं आहे की, ''सुखी पत्नी, सुखी जीवन' या म्हणेप्रमाणे या माणसाचे आयुष्य खूप छान होणार आहे, कारण ती एकच आनंदी वधू आहे.''