कोरोनाची स्थिती या देशात अंत्यत भयावह, डॉक्टरच रुग्णांना बेडला ठेवतात बांधून

 कोरोनाव्हायरसचा  (Coronavirus) मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. औषधसाठा नसल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. कोरोना बाधितांचा आकडा एकदम वाढल्याने डॉक्टरांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे.  

Updated: Apr 17, 2021, 12:04 PM IST
कोरोनाची स्थिती या देशात अंत्यत भयावह, डॉक्टरच रुग्णांना बेडला ठेवतात बांधून title=

ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये (Brazil) कोरोनाव्हायरसचा  (Coronavirus) मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. औषधसाठा नसल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. कोरोना बाधितांचा आकडा एकदम वाढल्याने डॉक्टरांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये औषधांच्या कमतरतेमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. परिस्थिती अशी आहे की बर्‍याच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेडवर बांधावे लागत आहे. 'एपी' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार असे म्हटले आहे की, डॉक्टरांना मोठ्या परिस्थितीतून जावे लागत आहे. औषधे (Sedatives)नसल्याने भयावहन परिस्थिती निर्माण झाली आहे. इंट्यूबेशनशिवाय उपचार करावे लागत आहे.

डॉक्टरांचा (Doctor) असहाय्यपणा  

इंट्यूबेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्हेंटिलेटरद्वारे रुग्णाला ऑक्सिजन दिले जाते. जेव्हा जेव्हा रुग्ण स्वतः श्वास घेण्यास अडचण येते. त्यावेळी इंट्यूबेशन या उपचार प्रणालीचा उपयोग केला जातो. Albert Schweitzer मनपा रुग्णालयाच्या एका डॉक्टरने सांगितले की, औषधांची तीव्र कमतरता आहे. Sedatives  औषधांचा साठा वाढवण्यासाठी आपण ते पातळ करावे लागेल. तथापि, जेव्हा हे समाप्त होते, तेव्हा आम्हाला न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्स वापरण्यास भाग पाडले जाते आणि रूग्णांना त्यांच्या बेडवर बांधले जाते.

स्पेनशी (Spain) औषधासाठी चर्चा

रिओ दी जानेरो आणि साओ पाउलो या दोन्ही ठिकाणी Sedatives औषधांची तीव्र कमतरता आहे. साओ पाउलोच्या आरोग्य सचिवांनी असेही म्हटले आहे की, गंभीर कोरोना रुग्णांना हाताळण्याची शहराची क्षमता आता संपत आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री मार्सेलो क्विरोगा म्हणाले, आपत्कालीन औषधे मिळविण्यासाठी सरकार स्पेन आणि इतर देशांशी चर्चा करीत आहे. रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन नसल्याचे त्यानी कबूल केले.

Jair Bolsonaro आपल्या भूमिकेवर ठाम

ब्राझीलमध्ये कोरोनाबरोबर परिस्थिती अधिकच खराब होत आहे. त्याचवेळी, दुसरीकडे अध्यक्ष जॅर बोलसोनारो यांनी आपली जुनी भूमिका कायम राखली आहे. ते अद्याप कोरोनाला एक गंभीर रोग मानण्यास तयार नाही, जरी ते स्वतः कोरोना संक्रमित झाले आहेत. बोलसनोरो केवळ कठोर उपायांना विरोध करत नाहीत तर लसची थट्टा देखील करतात. काही काळापूर्वी त्यांनी फायझरच्या लसीची मस्करी करण्यास मागेपुढे पाहिले नाही. ते म्हणाले होते की पुरुषांना ही लस दिल्यास मगरी होतील आणि स्त्रियांना दाढी येईल, असा अजब तर्क लढवलाय.