मुंबई : रिलेशनशिपमध्ये हे बऱ्याचदा घडतं की, एक व्यक्ती आपल्या जोडीदारासोबत खोटं बोलतो. तर काहीवेळा तो व्यक्ती खोटं बोलत नसला, तरी त्याच्या जोडीदाराला त्याच्यावरती संशय अलतो. ज्यामुळे तो आपला जोडीदार काय करतो? कुठे जातो? कोणाला भेटतो? या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवतो. बऱ्याचदा ते आपल्या जोडीदाराचा पाठलाग देखील करतात. परंतु यासंदर्भात एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
येथे एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचं खोटं पकडण्यासाठी ज्या युक्तीचा वापर केला आहे तो तुम्ही क्वचित कुठे ऐकला असेल. जे ऐकून पोलिस देखील हैराण झाले आहेत.
अमेरिकेतील हा तरुण ऍपल वॉचच्या मदतीने आपल्या गर्लफ्रेंडला स्टॉक करत आहे. ज्यामुळे त्याला पोलिसांनी देखील अटक केली. आधी तो हा गुन्हा मान्य करायला तयार नव्हता, परंतु नंतर त्याने हा सगळा प्रकार आपण केला असल्याचे मान्य केले. अॅपल एअरटॅग ट्रॅकर वापरून स्टॉक केले गेलेले हे पहिले प्रकरण नाही या आधीही अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत.
ऍपल वॉचच्या एअरटॅग ट्रॅकर या फीचरचा वापर करून कोणाचाही पाठलाग केला जाऊ शकतो. हे एक असामान्य आणि महाग तंत्र आहे. WSMV च्या अहवालानुसार, नॅशविल, टेनेसी येथील लॉरेन्स वेल्श यांनी आपल्या गर्लफ्रेंडच्या टायरच्या स्पोकवर ऍपल वॉच फिक्स केले.
लॉरेन्स Life360 ऍपसह त्या घड्याळाच्या स्थानाचा मागोवा घेत होता, ज्यामुळे त्याचा जोडीदार कोणत्या दिशेने आणि कुठे कुठे जात आहे हे त्याला समजले.
रिपोर्टनुसार, लॉरेन्स वेल्श आणि त्याच्या पार्टनरने एकमेकांच्या स्टेटसचा मागोवा घेण्यासाठी यापूर्वी Life360 अॅपचा वापर केला होता. बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या वापर केला.
रिपोर्टनुसार, लॉरेन्स वेल्श फॅमिली सर्व्हिस सेंटरमध्ये आला, पण आत जाण्याऐवजी तो गर्लफ्रेंडच्या कारजवळ गेला आणि समोरच्या ड्रायव्हरच्या बाजूच्या सिटच्या टायरजवळ बसला, जे पाहून सिक्योरिटीने पोलिसांना इशाला दिला आणि पोलिसांनी त्याला अटक केले.
रिपोर्टनुसार, वेल्शने गर्लफ्रेंडला अनेकदा जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आधीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याच्यावर घरगुती अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.