बाबा वेंगाची पुतिनबाबत भविष्यवाणी ठरणार का खरी? पाहा काय म्हणाले

वयाच्या 84 व्या वर्षी 1996 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, परंतु मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाणी करून ठेवल्या आहेत. 

Updated: Mar 29, 2022, 06:09 PM IST
बाबा वेंगाची पुतिनबाबत भविष्यवाणी ठरणार का खरी? पाहा काय म्हणाले title=

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक अचूक भाकीत करणाऱ्या रहस्यमय बाबा वेंगा यांचा दावा सध्या चर्चेत आहे. बल्गेरियाचे आंधळे बाबा वेंगा यांनी 50 वर्षांच्या कारकिर्दीत शेकडो भविष्यवाण्या केल्या आहेत, त्यांपैकी बरीच भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यांच्या लाखो अनुयायांचा असा विश्वास आहे की, त्यांच्याकडे टेलिपॅथीसह अनेक विलक्षण क्षमता आहेत आणि ते एलियन्सशी संवाद साधू शकतात. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबतही भाकीत केले आहे.

वयाच्या 84 व्या वर्षी 1996 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, परंतु मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाणी करून ठेवल्या आहेत. एका वादळात त्यांचे डोळे गेले मात्र त्यांना भविष्य बघण्याची दिव्यदृष्टी प्राप्त झाली, असं मानलं जातं.

Mirror.co.uk या इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, युक्रेन-रशियन युद्धाची भविष्यवाणी करणाऱ्या बाबा वाएंगा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 'लॉर्ड ऑफ द वर्ल्ड' बनतील, अशी भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांनी नैसर्गिक आपत्ती पाहिल्या आणि त्या होण्यापूर्वी लोकांना त्याबाबत सावध केले आहे.

व्लादिमीर पुतिन आणि रशिया जगावर वर्चस्व गाजवतील असे भाकीत बाबा वेंगा यांनी केले. 1979 मध्ये लेखक व्हॅलेंटीन सिदोरोव्ह यांनी वेंगाबरोबरच्या भेटीत बर्मिंगहॅम लाइव्हला सांगितले की, 'सर्व बर्फासारखे वितळेल, परंतु फक्त एकच गोष्ट अस्पर्श राहील' आणि ती म्हणजे 'व्लादिमीरचा अभिमान', 'रशियाचा अभिमान'. ते म्हणाले की बरेच  याला लोक बळी पडतील, परंतु रशियाला कोणीही रोखू शकत नाही आणि तुम्ही आताची रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाची परिस्थीती पाहिली. तर ती बाबा वेंगाच्या भविषवाणी प्रमाणे खरी होताना दिसत आहे.

डेली पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या मृत्यूपूर्वी, बाबा वेंगा यांनी पुन्हा एकदा रशियाच्या उज्ज्वल भविष्याची भविष्यवाणी केली. त्यांच्या मते रशिया हा जगातील एकमेव असा देश असेल ज्याच्याकडे महासत्ता असेल. अण्वस्त्रांचा वापर आणि तिसर्‍या महायुद्धाबाबतही त्यांनी भाकीत केले होते.

बाबा वेंगाची काही प्रसिद्ध भविष्यवाणी

जागतिक घटनांबद्दल आणि मानवतेच्या स्थितीबद्दलच्या त्याच्या अनेक भविष्यवाण्यांवर चर्चा केली गेली आहे. त्यांची लिहून ठेवलेल्या अनेक भविष्यवाणी खरी ठरली आहे, ज्यामध्ये त्यांनी आयएसआयएसचा उदय आणि अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सच्या घटनेविषयी भविष्यवाणी केली होती आणि ती खरी देखील ठरली.

तेव्हापासून तज्ञांनी गणना केली आहे की, त्यांचे 68 टक्के अंदाज खरे ठरले आहेत, तर त्यांच्या अनुयायांनी दावा केला आहे की, तो अंदाच 85 टक्क्यांपेक्षा थोडा कमी आहे.

कुर्स्क आण्विक पाणबुडी आपत्ती

1980 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगायांनी भविष्यवाणी केली. त्यांनी सांगितले की, 1999 च्या ऑगस्टमध्ये 'कुर्स्क पाण्याने झाकले जाईल आणि संपूर्ण जग त्यावर रडवेल'. कुर्स्क हा एक रशियन सब होता जो 12 ऑगस्ट 2000 रोजी बॅरेंट्स समुद्रात बुडाला आणि जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाला.

9/11 ची शोकांतिका

1989 मध्ये बाबा वेंगा यांनी आणखी एक भविष्यवाणी केली, 'भयानक! स्टील बर्ड्सच्या हल्ल्यात अमेरिकन लोक मारले जातील. लांडगे झाडीत गर्जना करतील आणि निरपराधांचे रक्त वाहू लागेल.' 11 सप्टेंबर 2001 रोजी, इस्लामिक अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या विमानांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला, ज्यामुळे हजारो निष्पाप लोक मारले गेले.

युरोपचे अस्तित्व संपुष्टात येईल

बाबा वेंगाच्या मते, 2016 पर्यंत, महाद्वीपचे अस्तित्व नाहीसे होईल, आणि जे काही उरले आहे ते रिक्त जागा आणि नापीक जमीन असेल, जवळजवळ कोणत्याही प्रकारचे जीवन नसलेले असेल. परंतु हे स्पष्टपणे शक्य झाले नसले तरी, ब्रिटनने 23 जून 2016 ला यूरोपीय संघ सोडण्यासाठी मतदान केलं होतं, ज्यामुळे तेथील वातावरण खराब झालं होतं.