Girlfriend Boyfriend Video Viral : प्रेम असलं की रुसणं आलंच...प्रेम खरं असेल तर आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ असाल तर त्याचासाठी तुम्ही काही पण करता. अगदी जीवाची पर्वा देखील करत नाहीत. एकमेकांवरील प्रेम वाढवणारा क्षण म्हणजे रुसवा फुगवा...प्रेमात कधी तो रुसतो तर कधी ती रुसते...प्रेम म्हटलं की राग आला..भाडणं आली..रुसवा देखील आला...आणि आजकाल ब्रेकअप पण आलं....
जर जोडीदाराचं एकमेकांवर खरं प्रेम असेल तर हा राग फार काळ टिकतं नाही. त्याशिवाय ते दोघे एकमेकांशिवाय राहू शकतं नाही म्हणून एक दुसऱ्याचा राग घालविण्यासाठी ते काही तरी नक्की करतात. कधी फुलं देऊन तर कधी गिफ्ट देऊन तर कधी अजून काही करतात. या अशा भांडण्यातून प्रेम वाढतं असं म्हणतात...
सोशल मीडियावर एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. ज्यामध्ये तो आपल्या गर्लफ्रेंडचा राग घालविण्यासाठी तिच्या घरी जातो. तिच्या राग घालविण्यासाठी तो गाणं गात असतो. तरुणी गेटच्या आत उभी असते. तिच्या चेहऱ्यावरील भाव काही वेगळंच सांगत असतात. तर तो तरुण प्रेमाने तिच्यासाठी गाणं गात असतो. तेवढ्यात घरातून एक तरुण बाहेर असतो. बॉयफ्रेंड गाण गाताता थबकतो...पण तो परत गायला सुरुवात करतो. (Boyfriend sings song front of sulky girlfriend house Seeing her in the arms of another young man video viral Social media trending now)
तेवढ्यात तो तरुण त्याचा गर्लफ्रेंडच्या जवळ जातो आणि तिला मीठी मारतो. हे पाहून बॉयफ्रेंडचा हृदयावर आघात होतो. हे दृश्य पाहून तो अक्षरशः तुटतो...त्याला अश्रू अनावर होतात...या व्हिडीओमध्य तो रडताना दिसतं आहे. हे पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या तरुणीला काही फरक पडलेला दिसतं नाही आहे. ती आणि तिच्यासोबत असलेला तरुण गळात मिठी मारून त्या तरुणाचं गाणं ऐकत आहेत.
Emotional damage. pic.twitter.com/dnfm92zoCI
— Figen (@TheFigen_) May 15, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Figen या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर यूजर्स भरभरुन आपलं मत मांडत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, ''अरे कुणाचे तरी मन दुखलं, तो तिथे का गेला?'' दुसर्याने लिहिलंय की, "त्याचासाठी हे खूप वेदनादायक आहे.''