मुंबई | प्रेमात कोण कधी काय करेल, याचा नेम नाही. जीव जडला की विषय संपला. प्रेमात असलेली प्रत्येक व्यक्ती ही आपल्या प्रियकर/प्रेयसीसाठी अगदी तारे वगैरे तोडून आणण्याची भाषा करतात. हे सर्व डॉयलॉग सिनेमापुरतेच बरे वाटतात. पण एका पठ्ठ्याने असं काही केलंय ते ऐकून तुम्हाला ही फिल्मी स्टोरी वाटू शकते. पण या रिअल लाईफ हिरोसोबत जे झालं, ते ऐकूण मात्र तुम्हालाही नक्कीच वाईट वाटेल. (boyfriend donated a kidney to save life of his girlfriend mother a month later the girlfriend married someone else)
इथं साधं कोणी 100 रुपये देत नाही. मात्र या भावाने त्याच्या प्रेयसीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी चक्क किडनी दिली. पण त्यानंतर एका महिन्याने प्रेयसीने त्या प्रियकरासोबत जे केलं ते ऐकूण तुम्हीही म्हणाल, वाईट झालं राव.
त्याचं झालं असं की, किडनी दिल्यानंतर त्या प्रियकराच्या प्रेयसीने दुसऱ्याचाच हात धरला. अहो म्हणजे दुसऱ्याच मुलासोबत लग्न केलं. स्वप्न एकाला दाखवली आणि फेरे दुसऱ्याच सोबत घेतले. हा संपूर्ण प्रकार मेक्सिकोत घडलाय. 'द सन'ने याबाबतचं वृत्त दिलंय.
उजिएल मार्टिनेज या तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या आईला किडनी दिली. उजिएल हा मॅक्सिकोतील बाजा कॅलिफॉर्निमधून शिक्षण घेतोय. उजिएलने व्हीडिओ शेअर करत त्याच्यासोबत जे घडलंय ते सांगितलंय. हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होतोय.
व्हीडिओत नेमकं काय?
"प्रेयसीवर जाम प्रेम होतं. त्यामुळे मी तिच्या आईला किडनी दिली. मात्र किडनी दिल्यानंतरच्या महिन्याभराने प्रेयसीने माझ्यासोबत ब्रेकअप केला. ब्रेकअपनंतर तिने दुसऱ्याच कोणासोबत संसार थाटला", असं उजिएल या व्हीडिओत म्हणालाय. उजिएलने शेअर केलेल्या व्हीडिओ 16 मिलिअन पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.
व्हीडिओत केलेल्या दाव्यानुसार, उजिएलच्या आईला किडनीची गरज होती. त्यांची प्रकृती फार चिंताजनक होती. किडनी प्रत्यारोपण करणं गरजेचं होतं. उजिएलने पुढचा-मागचा विचार न करता थेट किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. मात्र उजिएलच्या प्रेयसीने त्याच्यासोबत जे केलं, ते नक्कीच कोणालाही न पटणारं होतं.
दुनियादारी सिनेमातील डॉयलॉगप्रमाणे, "कसं झालं, का झालं, माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने झालं हे आता महत्तवाचं नाही. जे व्हायचं ते होऊन गेलं, आता फक्त एकच विनंती आहे, मला विसरुन जा" हा डॉयलॉग या प्रियकर उजिएलला चपखळपणे लागू पडतोय.
उजिएल असताना त्याच्या प्रेयसीने दुसऱ्या कोणासोबत लग्न केलं. यामागे कारण असेल किंवा नसेलही. मात्र त्या प्रेयसीने उजिएलसोबत निश्चितच असं करायला नको होतं, अशीच नेटीझन्स तीव्र भावना व्यक्त करत आहेत.