मुंबई : वेग-वेगळ्या ड्रेस स्टाईलवर प्रत्येकाला बूट देखील आकर्षक हवे असतात. पाहायला गेलं तर बाजारात अनेक वेग-वेगळ्या बुटांचे ब्रांड आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'Balenciaga'. या महागड्या बुटांचा ब्रांड सध्या तुफान चर्चेत आला आहे. या ब्रांडचे 'पुर्णपणे खाराब झालेले स्नीकर्स (sneakers)' चर्चेचा विषय ठरत आहे.
लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलेले हे शूज ‘पॅरिस स्नीकर’ कलेक्शन अंतर्गत लाँच करण्यात आले आहेत. हाय-टॉप आणि बॅकलेस म्यूल- दोन शैलींमध्ये विकले जात आहेत. या खराब स्निकर्सची किंमत $495 (जवळपास ₹48,000)ते $1,850 (जवळपास ₹1.44 लाख) पर्यंत आहे.
Balenciaga's New "Fully Destroyed" Shoe Set
R6 000 per pairWould you wear these? pic.twitter.com/oEduoUs1Fj
claztik(@claztik) May 11, 2022
महत्त्वाचं म्हणजे बूट जितके खराब तितकी त्या बुटांची किंमत जास्त. खूप जास्त कापलेल्या, खरचटलेल्या आणि घाणेरडे बूट खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्वाधिक पैसे मोजावे लागतील. सध्या सोशल मीडिया हे बूट आणि त्यांची किंमत व्हायरल होत आहेत.
एडिशन शूजच्या फक्त 100 जोड्या उपलब्ध आहेत. जे Balenciaga च्या नवीन मोहिमेचा भाग आहेत. असं म्हटलं जात आहे की "हे स्नीकर्स आयुष्यभर घालायचे असतात." स्नीकर्स balenciaga.com वर जगभरात उपलब्ध आहे.