अफगाणिस्तानात सोडलेल्या अमेरिकन विमानांचा तालिबान कधीच वापर करु शकणार नाही, कारण...

Afghanistan Updates : अमेरिकन सैन्याने (US Army) सोमवारी रात्री काबूल सोडले आणि तालिबानने (Taliban) काबूल विमानतळावर (Kabul Airport) ताबा मिळवला. पण..

Updated: Sep 1, 2021, 01:34 PM IST
अफगाणिस्तानात सोडलेल्या अमेरिकन विमानांचा तालिबान कधीच वापर करु शकणार नाही, कारण... title=

काबूल: Afghanistan Updates : अमेरिकन सैन्याने (US Army) सोमवारी रात्री काबूल सोडले आणि तालिबानने (Taliban) काबूल विमानतळावर (Kabul Airport) ताबा मिळवला. पण येथे ठेवलेल्या विमानांचा तालिबान कधीही वापर करू शकणार नाही. याचे कारण म्हणजे अमेरिकन लष्कराने ही विमाने निष्क्रिय केली आहेत. त्यामुळे आता ही विमाने भंगारात टाकण्याजोगी झालेली आहेत.

ही विमाने तालिबानसाठी बिन कामाची

ही विमाने निष्क्रिय केल्यांने यांचा उपयोग होणार नाही. अमेरिकेने सोडून दिलेली विमाने काबूल विमानतळावर आहेत. अमेरिकेन सैन्याने काबूलमध्ये सोडले आणि आपल्या देशात जाणे पसंत केले आहे. ही सर्व विमाने निरुपयोगी असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. त्यांनी दावा केला आहे की, तालिबानच्या ताब्यात असलेल्या सर्व अमेरिकन विमानांपैकी एकही तालिबानच्या उपयोगात येणार नाही. तसेच तालिबान ते उडवू शकणार नाही, कारण काबूल सोडण्यापूर्वी अमेरिकन सैन्याने सर्व विमानांना डॅमेज केले आहे.

Zee News ने दाव्याची केली पडताळणी 

'झी मीडिया'चे रिपोर्टर अनस मलिक यांनी काबूल विमानतळावर (Kabul Airport) उभ्या असलेल्या अमेरिकन विमानांची पाहणी केली आणि त्यांच्या अहवालात असे काही पुरावे सापडले आहेत, जे अमेरिकन दाव्यावर शिक्कामोर्तब करत आहेत. अमेरिकेचे शिनूक आणि एमडी सारखी लढाऊ हेलिकॉप्टर काबूल विमानतळावर उभी आहेत, परंतु ही हेलिकॉप्टर उडण्याच्या स्थितीत नाहीत, कारण त्यांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच त्यामुळे सुटकेचा श्वास घेता येईल.

अमेरिकन लष्कराने विमान आणि वाहने केली निकामी 

सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेन्झी (Kenneth Mackenzie) यांनी सांगितले की, हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ठेवलेली 73 विमाने बंद करण्यात आली आहेत. मॅकेन्झी म्हणाले, 'ही विमाने पुन्हा कधीही उडणार नाहीत. त्यांना कोणीही कधीही चालवू शकणार नाही. जरी यातील बहुतेक विमाने मिशनसाठी बांधली गेली नव्हती, परंतु तरीही कोणीही त्यांना उडवू शकणार नाही.

मॅकेन्झी यांनी असेही म्हटले आहे की, अमेरिकन सैन्याने विमानतळावर सुमारे 70 माइन रेजिसटेंट अॅम्बश प्रोटेक्शन (एमआरएपी) वाहने सोडून दिली आहेत. ही वाहने आयईडी हल्ले आणि शत्रूचे हल्ले सहन करू शकत होती. वाहनाची किंमत 1 दशलक्ष डॉलर्सपर्यंत आहे. लष्करानेही त्यांना निष्क्रिय केले आहे.

अमेरिकन सैनिकांनी ही विमाने आणि वाहने सोडली

33 - MI17  विमान
33 - UH60 ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर
43 - MD 530 हेलिकॉप्टर
73 - विमान
70 - बख्तरबंद वाहने
27 - HUMVEES

अमेरिकन सैनिकांनीही तालिबानचा गणवेश घातला होता!

अमेरिकन सैनिक केवळ काबूल विमानतळावरुन बाहेर पडले नाहीत, तर तालिबान्यांनीही त्यांच्या गणवेशात कपडे घातले होते. अमेरिकन सैन्याने परिधान केलेला गणवेश, अफगाणिस्तानमध्ये लोकशाहीचे रक्षण करण्याचे वचन दिले. तोच गणवेश परिधान करून तालिबान आता शरियातून लोकशाही नष्ट करण्याची घोषणा करत आहे.