पृथ्वीवर येऊ शकते खतरनाक सौर वादळ, जगभरातील इंटरनेट सिस्टीम पडेल ठप्प

Solar Storm can come to Earth : भविष्यात असे सौर वादळ (Solar Storm) येऊ शकते.

Updated: Sep 1, 2021, 10:58 AM IST
पृथ्वीवर येऊ शकते खतरनाक सौर वादळ, जगभरातील इंटरनेट सिस्टीम पडेल ठप्प  title=

कॅलिफोर्निया: Solar Storm can come to Earth : भविष्यात असे सौर वादळ (Solar Storm) येऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या काही भागात इंटरनेट ठप्प किंवा बंद पडू (Internet Apocalypse) शकते. असे झाल्यास विविध देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल आणि अनेक देश पूर्णपणे गरीब होतील. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक संगीता अब्दु ज्योती (Sangeetha Abdu Jyothi) यांनी हा इशारा दिला आहे.

मोठे सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता

इन्स्टा बंपरच्या अहवालानुसार, भारतीय वंशाच्या संशोधक संगीता अब्दु ज्योती (Sangeetha Abdu Jyothi) यांनी सौर वादळांचा अभ्यास केला आहे. त्यांनी संशोधनात म्हटले आहे की, भविष्यात असे भयानक सौर वादळ येईल. ज्यामुळे इंटरनेट प्रलय होऊ शकतो. म्हणजेच संपूर्ण जगाचे इंटरनेट बंद होऊ शकते.

अभ्यासानुसार, या सौर वादळाचा (Solar Storm) परिणाम महासागरांमध्ये पसरलेल्या इंटरनेट केबलवर होऊ शकतो. या केबल्स जगातील विविध देशांना जोडतात. या सागरी केबल्समध्ये रिपीटर्स  (Repeaters) बसवले जातात जेणेकरून इंटरनेट प्रवाह कायम राहील. ते सौर वादळांना अत्यंत संवेदनशील असतात.

जगात इंटरनेट बंद होईल

जेव्हा सौर वादळ  (Solar Storm) येते तेव्हा या रिपीटर्सची स्थिती बिघडू शकते. ते निकामीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत, केबलमधील करंट बंद होताच जगभरातील इंटरनेट नेटवर्क ऑफलाइन होईल. त्याचा प्रभाव फायबर ऑप्टिकलशी जोडलेल्या देशांच्या अंतर्गत इंटरनेटपर्यंत पोहोचू शकतो आणि ते ठप्प पडू शकते.

या अहवालात म्हटले आहे की, जेव्हा सौर वादळे येतात तेव्हा ते विद्युत ग्रिडचे नुकसान करतात. यामुळे मोठ्या भागात अंधार होतो. त्यांचा इंटरनेट प्रणालीवरही परिणाम होतो. इंटरनेट बंद झाल्यामुळे अर्थव्यवस्था, दळणवळण व्यवस्था, संरक्षण, दूरसंचार यासारख्या क्षेत्रांची चाके थांबू शकतात. यामुळे त्या देशांची अर्थव्यवस्था कोसळू शकेल. यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणेही कठीण होईल.

नुकसानीचा अंदाज लावू शकत नाही

संशोधक संगीता ज्योती सांगतात की सर्वात मोठी भीती ही आहे की आपल्याकडे सौर वादळे (Solar Storm) आणि त्यांच्या प्रभावांबद्दल खूप कमी डेटा आहे. त्यामुळे नुकसान किती मोठे होईल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. जगातील सर्वात गंभीर सौर वादळे 1859, 1921 आणि 1989 मध्ये आली. यामुळे अनेक देशांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रीड अयशस्वी झाले होते. अनेक राज्ये अनेक तास अंधारात होती.

ज्योती सांगतात की ही चिंतेची बाब म्हणजे, जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाकडे सौर वादळांचे परिणाम मोजण्यासाठी किंवा अंदाज लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. आपत्तीजनक सौर वादळ आपल्या पॉवर ग्रीड, इंटरनेट सिस्टीम, नेव्हिगेशन आणि उपग्रहांवर परिणाम करेल की नाही हे आम्हाला माहित नाही.