प्रसिद्ध अलिबाबा डॉट कॉमच्या संस्थापकाची अखेर निवृत्ती

अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला...

Updated: Sep 11, 2019, 09:42 PM IST
प्रसिद्ध अलिबाबा डॉट कॉमच्या संस्थापकाची अखेर निवृत्ती title=

मुंबई : चीन या देशातील प्रख्यात ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका वर्षापूर्वीच हा निर्णय जॅक मा यांनी घेतला  होता. अलिबाब या कंपनीचा व्यवसाय हा संपूर्ण जगात पसरलेला आहे. जॅक मा हे चीनमधील नामांकित व्यावसायिक आहेत.

जॅक मा यांनी मंगळवारी त्यांच्या ५५ व्या वाढदिवसाच्या दिवशी हा निर्णय घेतला. या बातमीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यांनी १९९९ साली उत्तर अमेरिकेत अलिबाबा या कंपनीची स्थापना केली होती. औद्योगिक क्षेत्रात चीन आणि अमेरीका एकामेंकाचे प्रतिस्पर्धी आहेत.

कंपनीला राजीनामा दिल्यानंतरही जॅक मा. हे अलिबाब पार्टनरशीपचे सदस्य राहतील. हा समूह ३६ सदस्याचा आहे. ज्यात जॅम मा यांना देखील काही निर्णय घेण्याचे अधिकार असणार आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली पाहिजे, यासाठी त्यांनी अनेक मोठे बदल केले होते.

 



Jack Ma

 

अलिबाबा कंपनीने जूनच्या अखेरला १६.७ अब्ज डॉलर्स कमावले होते. म्हणजेच ६६ टक्के देशांतर्गत व्यवसायाचा हिस्सा त्यावेळी राहिला होता. जॅक मा पदावरून गेल्यानंतरही कंपनी यशाची पाऊले चढत राहील. ऑनलाईन शॉपिंग साईटपैकी अलीबाबा मोठी साईड आहे.

जॅक मा यांची एकूण संपत्ती १ अब्ज डॉलर्स आहे. जॅक मा यांनी विचार केला आहे की, त्यांच्या संपत्तीचा वापर हा गरीब मुलांच्या शिक्षणावर व्हावा. औद्योगिक क्षेत्रात अनेकदा कंपनी स्टॉकच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असतात, मात्र अलिबाबाच्या बाबतीत असं कधी घडलं नाही.

जॅक मा यांच्या कारकिर्दीत कंपनीने फार प्रगती केली ते कंपनीसाठी ब्रॅन्ड अॅम्बेंसडर सारखे आहेत. त्यांनी दोन वर्षापूर्वी अलिबाबा कंपनीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माईकल जॅकसनच्या गाण्यावर डान्स देखील केला होता.