विषारी कोबराला शॅम्पूने आंघोळ, अचानक घातला मानेला विळखा...हादरवणारा Video

Cobra Bathing Video : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती पाळिव कुत्र्या-मांजराप्रमाणे चक्क एका विषारी कोबरा सापाला शँम्पूने आंघोळ घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना डोळ्यावर विश्वास बसत नाहीए.

Updated: Jun 24, 2024, 05:37 PM IST
विषारी कोबराला शॅम्पूने आंघोळ, अचानक घातला मानेला विळखा...हादरवणारा Video title=

Cobra Bathing Video : पाळिव कु्त्रा किंवा मांजरीला साबण-शॅम्पू लावून आंघोळ (Bath) घातली जात असताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल. पण कधी विषारी सापाला आंघोळ घालताना तुम्ही पाहिलाय. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सच्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीए. या व्हिडिओची सोशल मीडियावर (Viral Video) जोरदार चर्चा आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ आपण पाहून विसरुन जातो. तर काही व्हिडिओ पाहून थक्क होतो. असाच थक्क करणारा हा व्हिडिओ आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक व्यक्ती विषारी कोबरा (Cobra) सापाला चक्क शॅम्पू लावून आंघोळ घालताना दिसत आहे. हा व्यक्ती हातात शॅम्पू घेऊन विशालकाय कोबराला आंघोळ घालताना दिसतोय. लहान मुलांना ज्याप्रमाणे मालिश करुन आंघोळ घातली जाते, त्यप्रमाणे हा व्यक्ती कोबराला आंघोळ घालताना दिसतोय. 

आंघोळ घालत असताना अचानक साप त्या व्यक्तीच्या मानेला विळखा घालतो. पण तो व्यक्ती अगदी सहज तो विळखा सोडवतो आणि पुन्हा कोबराला पाण्याखाली धरतो. अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर  @saleesh_thrissur नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 6.16 कोटीहून जास्त लोकांनी पाहिला आहे. हजारो युजर्सने या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 

युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया
एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. सापाला आंघोळ घातल्यानंतर जॉन्सन बेबी पावडर लावायला विसरु नकोस असा सल्ला त्या व्यक्तीला दिलाय. तर एका युजरने म्हटलंय भावाची यमराजसोबत मैत्री दिसतेय. एका युजरने या व्यक्तीला अमर राहाण्याचं वरदान मिळालेलं दिसतंय, अशी प्रतिक्रिया नोंदवलीय.

कोबरा साप किती विषारी?
सापांमध्यो कोबरा ही जात सर्वात विषारी म्हणून ओळखली जाते. कोबराच्या एका दंशाने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो. भारतात आढळले कोबरा आणि किंग कोबरा यांच्यात मोठा फरक असतो. भारतीय कोबराची लांबी साधाराण 4 ते 7 फूट असते. तर किंग कोबराची लांगी तब्बल 13 फुटांहून जास्त असते. पण उत्तराखंडमध्ये एका मृत कोबरा साप आढळून आला होता. या सापाची लांबी 23 फूट 9 इंच इतकी होती. जगातील हा सर्वात लांबीचा किंग कोबरा होता असा दावाही केला जातोय. हा दुर्मिळ साप असल्याचंही सांगितलं जातंय.