Afganistan Crisis : तालिबान-नॉर्दन अलायंसमध्ये चर्चा, एकत्र सरकार चालवणार?

अफगाणिस्तानच्या पंजशीर भागावर अजूनही तालिबानला ताबा मिळवण्यात अपयश आलं आहे. 

Updated: Aug 26, 2021, 04:24 PM IST
Afganistan Crisis : तालिबान-नॉर्दन अलायंसमध्ये चर्चा, एकत्र सरकार चालवणार? title=

काबुल : अफगाणिस्तानच्या पंजशीर भागावर अजूनही तालिबानला ताबा मिळवण्यात अपयश आलं आहे. संपूर्ण अफगाणिस्तावर राज्य करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तालिबानला एका युवा नेत्याचं आव्हान दिलं आहे. तालिबान आणि नॉर्दर्न अलायंसमध्ये सीजफायरची डील झाल्याचं समोर यंत आहे. पण नॉर्दर्न एलायंसचे प्रमुख अहमद मसूद यांचे सहकारी फहीम दश्ती यांनी मात्र याला नकार दिला आहे. फहीम यांच्या मते अजून चर्चा सुरु आहे.

अहमद मसूदच्या नेतृत्वात नॉर्दर्न अलायंस आणि तालिबान यांच्यात परवान येथे चर्चा सुरु आहे. तालिबानकडून मौलाना अमीर खान चर्चेसाठी आले आहे. तालिबानकडून या चर्चेला अमन जिरगा नाव देण्यात आलं आहे.

पंजशीरबाबत तालीबानचं म्हणणं आहे की, दोन्ही बाजुने सीज़फायरवर सहमती झाली आहे. पंजशीरमध्ये दोन्ही बाजुने कोणीही गोळीबार करणार नाही आणि तणाव देखील निर्माण करणार नाहीत.

याआधी पंजशीरच्या सीमेवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 300 तालिबानी मारले गेल्याची माहिती आहे. तालिबान पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण नॉर्दन अलायंसने त्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे.

अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद नॉर्दर्न अलायंसचे नेतृत्व करत आहे. स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषित करणाऱे अमरुल्ला सालेह देखील याच भागात थांबले आहेत. दोन्ही बाजुने एकत्र सरकार चालवण्याबाबत ही चर्चा सुरु आहे. पण यासाठी नॉर्दन अलायंसच्या ताही अटी आहेत. ज्यावर लवकरच तोडगा निघेल असं ही म्हटलं जात आहे.