लहानपणी वडील आणि भाऊ रोज करत होते बलात्कार, पण तिला माहितीच नव्हतं; 50 वर्षांनी एका कागदामुळे गुन्हा झाला उघड

Crime News: लहान असताना आपल्यावर वडील आणि भाऊ बलात्कार करत होते हे एका महिलेला तब्बल 50 वर्षांनी कळलं आहे. महिला तेव्हा साडे तीन वर्षांची होती. लहान असल्याने तिच्या फार काही लक्षात नव्हतं. पण एका कागदामुळे महिलेला याची माहिती मिळाली आणि गुन्हा समोर आला.   

शिवराज यादव | Updated: May 11, 2023, 11:18 AM IST
लहानपणी वडील आणि भाऊ रोज करत होते बलात्कार, पण तिला माहितीच नव्हतं; 50 वर्षांनी एका कागदामुळे गुन्हा झाला उघड title=

Crime News: लहान असताना आपल्यावर वडील आणि भाऊ बलात्कार (Rape) करत होते हे एका महिलेला तब्बल 50 वर्षांनी कळलं आहे. महिला तेव्हा साडे तीन वर्षांची होती. लहान असल्याने तिच्या फार काही लक्षात नव्हतं. जसजशी ती मोठी झाली, तिच्या बालपणीच्या आठवणी धुसर होत गेल्या. पण एक वैद्यकीय कागदामुळे ही धक्कादायक गोष्ट तिला समजली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर तिने पती आणि भावाला जेलमध्ये पाठवलं आहे. 

साराचे वडील आर्थुर विलियम बाउडविच आणि 54 वर्षीय भाऊ आर्थुर स्टीफन बाउडविच यांनी एकूण 32 वर्षाची जेल झाली आहे. सारा साडे तीन वर्षांची असताना पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पण यामुळे तिची प्रकृती बिघडली होती. तिच्यावर सर्जरी कराव लागली होती. या सर्जरीचा रिपोर्टच साराच्या हाती लागला असून सर्वात मोठा पुरावा ठरला आहे. 

डेली मेलने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यानुसार साराने सांगितलं आहे की, "मला 2021 पर्यंत या सर्जरीबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण मी जेव्हा माझे मेडिकल रेकॉर्ड पाहिले तेव्हा मला धक्काच बसला. पण त्याच वेळी माझ्या वडिलांवर खटला भरण्यासाठी फिर्यादीची गरज होती 50 वर्षं मौन बाळगल्यानंतर मला यावर आता बोललं पाहिजे असं वाटलं. मी साडे तीन वर्षांची असताना माझ्यावर पहिला बलात्कार झाला होता. मला तेव्हा पलंगावरुन उचलून वडिलांच्या बेडवर नेण्यात आलं आणि बलात्कार करण्यात आला".

"मला त्या वेदना आजही लक्षात आहेत. मला लक्षात आहे की माझा ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी तोंडावर हात ठेवला जात होता," असं साराने सांगितलं आहे. मात्र या अत्याचारामुळे साराला गंभीर जखम झाली होती. यामुळे वयाच्या चौथ्या वर्षी तिच्यावर सर्जरी करण्यात आली होती. तिच्या वडिलांनी डॉक्टरांना खाली पडल्यान ती जखमी झाल्याचं खोटं सांगितलं होतं. 

दरम्यान सारा 4 वर्षांची असताना तिचे वडील घरापासून दूर गेले होते. पण जेव्हा ती 6 वर्षांची झाली तेव्हा ते पुन्हा घरी परतले आणि बलात्कार करण्यास सुरुवात केली. जेव्हा साराची आई घऱाबाहेर असायची तेव्हा ते नेहमी बलात्कार करायचे. 

"एकदा मला त्यांनी बेडरुममध्ये जाण्यास सांगितलं असता, मी नकार दिला. तेव्हा मी 10 वर्षांची होती. त्यांनी माझे केस पकडून फरफटत बेडरुममध्ये नेलं. त्यांनी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्यांना मला मारुन टाका असं म्हटलं, म्हणजे किमान या यातना सहन कराव्या लागणार नाहीत. ते गेल्यानंतर मी उशी बाजूला सारुन श्वास घेण्याचा प्रयत्न केला. मला हे सर्व संपवायचं होतं. एकदा तर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत कोणाला सांगितलंस तर मारुन टाकेन अशी धमकी दिली होती," असा खुलासा तिने केला आहे. 

दरम्यान सारा 13 वर्षांची असताना तिचे आई-वडील वेगळे झाले. यानंतर आता आपला त्रास संपेल असं तिला वाटत होतं. पण यानंतर तिच्या भावाने बलात्कार करण्यास सुरुवात केली. तो 17 वर्षांचा होता. पण तिने याची वाच्यता केली नाही. साराने लग्न केल्यानंतर पहिलं लग्न मोडलं. यानंतर 2019 मध्ये तिने दुसऱ्या पतीच्या मदतीने अधिकृतपणे तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून मेडिकल रिपोर्ट सादर केला ज्यामध्ये तिच्या शरिरातील जखमा बऱ्या करण्यासाठी सर्जरी करण्यात आली होती. 

कोर्टाने वडील आणि मुलाला दोषी ठरवलं आहे. वडिलांना 10 तर भावाला 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Tags: