दोघांचे नाही तर तिघांचे बाळ! ट्रिपल DNA असणारे आश्चर्यकारक Super Baby

अनुवंशिक आजारांमुळे अनेक बाळांचे आरोग्य धोक्यात येते. मात्र, ट्रिपल DNA असलेल्या या बाळांना कोणत्याही प्रकारचे अनुवंशिक आजार होणार नाहीत. म्हणूनच या बाळाला सुपर बेबी असे संबोधित करण्यात आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 10, 2023, 08:48 PM IST
दोघांचे नाही तर तिघांचे बाळ! ट्रिपल DNA असणारे आश्चर्यकारक Super Baby title=

Superkid : बाळामध्ये आई वडिलांचा DNA असतो यामुळे त्याला अनुवंशिक आजाराचा सामना करावा लागतो. मात्र, इंग्लंडमध्ये अशा एका आश्चर्यकारक Super Baby चा जन्म झाला आहे. या बाळामध्ये फक्त आई वडिल नाही तर याच्यात आहे आणखी एकाचा DNA आहे. विशेष म्हणजे या बाळाला कोणताही अनुवंशिक आजार होणार नाही असा दावा केला जात आहे. हे बाळ दोघांचे नाही तर तिघांचे आहे. 

जगातील पहिल्या सुपरकिडचा जन्म झाला आहे. या सुपर बेबीला  कोणत्याही प्रकारचा अनुवांशिक आजार होणार नाही. तसेच याच्या शरीरात हानिकारक अनुवांशिक उत्परिवर्तन होणार नाही असा दावा केला जात आहे. आई वडिलांसह आणखी एका व्यक्तीच्या DNA पासून या बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाचे तीन पालक आहेत. 

आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर 

या बाळाचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन झाला आहे. ज्या तंत्राने हे मूल तयार केले आहे त्याला मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट (MDT) असे म्हणतात. या बाळाला जन्म देण्यासाठी निरोगी महिलेच्या अंड्यातून टिश्यू घेऊन आयव्हीएफ भ्रूण तयार करण्यात आला आहे.  मात्र, ज्या महिलेच्या गर्भातून या बाळाचा जन्म झाला आहे त्या महिलेले असेलेल अनुवंशिक आजार या बाळाला होणार नाहीत. या गर्भामध्ये जैविक पालकांचे शुक्राणू आणि अंडी यांचे मायटोकॉन्ड्रिया यांचा समावेश आहे.

माइटोकॉन्ड्रिया सर्व प्रकारच्या पेशी नियंत्रीत करते. इंग्लंडमधील न्यूकॅसल फर्टिलिटी सेंटरमध्ये या मुलाचा जन्म झाला आहे. अनुवंशिक आजार आई वडिलांपासून मुलांमध्ये येतात. मात्र, या ट्रिपल  DNA तंत्रज्ञानामुळे बाळांना कोणत्याही प्रकारचे अनुवंशिक आजार होणार नाहीत. लाखो मुलं अनुवंशिक आजाराने त्रस्त असतात. मात्र, हा सुपर बेबीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अशा प्रकारच्या ट्रीटमेंटने मुलांना अनुवंशिक आजारांपासून दूर ठेवता येवू शकतो. 

रक्ताच्या थेंबातून मूल जन्माला येणार?

केवळ रक्ताच्या थेंबातून किंवा त्वचेच्या पेशीतून मूल जन्माला येऊ शकतं, असं कुणी म्हटलं तर ते काल्पनिक वाटू शकतं. मात्र थांबा.. जपानमध्ये एक असं संशोधन यशस्वी झालंय ज्यातून केवळ त्वचेच्या पेशीतून प्रजोत्पादनाची प्रक्रिया पार पडलीय. विशेष म्हणजे स्त्री-बीज आणि शुक्राणूंशिवायच प्रजननाची प्रक्रिया पार पडलीय.. जपानच्या रिप्रोडक्टीव्ह बायोलॉजिस्ट लॅबमध्ये उंदरांवर एक प्रयोग करण्यात आला आहे. जपानच्या प्रयोगशाळांमध्ये उंदरांवर हा प्रयोग यशस्वी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थात त्यातही अनेक अडचणी आल्या. त्यामुळे हा दावा संशोधनाच्या पातळीवर आहे. माणसांच्याबाबतही प्रजननपेशी..शुक्राणू आणि स्त्रीबीजाशिवाय प्रजनन शक्य होऊ शकतं, याबाबत पुढच्या काही वर्षात संशोधन समोर येऊ शकतं. सध्या तरी मानवी पेशींबाबत असं कोणतंही संशोधन सुरु नाही.